तांदूळ स्वयंपाकाव्यतिरिक्त धार्मिक कार्यातही आपण वापरतो. पण तांदळाचा वापर करण्याआधी तो एकदा तरी गॅसवर टाकून पाहायला हवा. आता तांदूळ गॅसवर टाकण्याचा काय फायदा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एका गृहिणीने हा उपाय दाखवला आहे, जो एकदा का तुम्ही पाहिलात तर तुम्हीसुद्धा कराल.
तांदूळ गॅसवर टाकण्याचा फायदा काय?
तुम्हाला करायचं काय आहे तर हातात किंवा एका भांड्यात थोडे तांदूळ घ्या. गॅस पेटवा आणि त्यावर हे तांदूळ टाका. काही तांदूळ तुम्हाला जळताना, काळे होताना दिसले म्हणजे ते प्लॅस्टिकचे तांदूळ आहेत हे ओळखून जा. असे तांदूळ खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. हल्ली तांदळात प्लॅस्टिक तांदळाची भेसळ केली जाते असं म्हणतात. ते ओळखण्यासाठी ही सोपी अशी ट्रिक आहे.
advertisement
Priti khandar recipe ☺युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
बनावट तांदूळ ओळखण्याच्या आणखी काही ट्रिक
1. तांदूळ प्लॅस्टीकचा असेल तर तो गरम तेलात टाकल्यावर वितळू लागेल.
2. प्लॅस्टीकचा तांदूळ पाण्यात टाकल्यावर तो तरंगायला लागतो.
3. प्लॅस्टिकचा तांदूळ उकळताना भांड्याच्या वरचा भाग जाड थरासारखा दिसतो.
4. याशिवाय एक उपाय म्हणजे तांदूळ शिजवल्यानंतर काही दिवस असेच राहू द्या, हा जर प्लास्टिकचा तांदूळ असेल तर त्याचा वास येणार नाही कारण तो कुजत नाही.
Kitchen Jugaad Video: सिलेंडर रिकामा होताच सर्वात आधी त्यावर भांडं ठेवा; फायदा काय पाहा
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)