TRENDING:

रस्त्यावरील छोटा भक्त, बाप्पासाठी डिव्हायडरवर उभारलं मंदिर, Video ने नेटकऱ्यांचं जिंकलं मन

Last Updated:

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात रोज लाखो दृश्यं डोळ्यांसमोरून सरतात. पण कधीकधी एखादं साधं, निरागस दृश्य थेट हृदयाला भिडतं आणि जगभरातल्या लोकांना विचार करायला भाग पाडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडिया हे व्हिडीओचं जग आहे, इथे तुम्हाला देशातीलच नाही तर जगातील कुठल्याही भागातले व्हिडीओ पाहाता येतात. येथील काही व्हिडीओ हे खूपच भावनीक असतात, तर काही खूप मजेदार असतात. सध्या गणेशोत्सव भारतात साजरा होत आहे, त्यामुळे यासंबंधीत अनेक फोटो व्हिडीओ तुम्ही इंस्टाग्रामच्या फीडमध्ये पाहिलं असेल. पण गणेशाशी संबंधीत एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने अनेकांचं मन जिंकलं आहे. हा व्हिडीओ मुंबईतील आहे.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
advertisement

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात रोज लाखो दृश्यं डोळ्यांसमोरून सरतात. पण कधीकधी एखादं साधं, निरागस दृश्य थेट हृदयाला भिडतं आणि जगभरातल्या लोकांना विचार करायला भाग पाडतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

हा व्हिडीओ रस्त्यावर राहणाऱ्या एका गरीब मुलाचा आहे जो साधारण 9 ते 19 वर्षांचा आहे. रस्त्याच्या डिव्हायडरवर त्याने एक पत्रा लावून त्याखाली बाप्पाची लहानशी मूर्ती ठेवली आहे. त्याच मूर्तीसमोर तो निरागस मुलगा मनोभावे बसून आरती म्हणताना दिसतो.

advertisement

लहान अशी मुर्ती, साधं पत्र्याचं छप्पर आणि त्या मुलाच्या डोळ्यातील भक्ती एवढंच त्याचं जग. आलिशान मंदिरं, सजावट, गाजावाजा काहीच नाही. तो आपला एकटाच बाप्पाच्या भक्तीत रमला. पण या लहानग्याची श्रद्धा इतकी खोल आहे की ती हजारो नेटकऱ्यांच्या हृदयाला भिडली.

हा व्हिडीओ एका व्यक्तीनं मुंबईत सिग्नलवर उभं असताना कॅमेरात टिपला. इंस्टाग्राम युजर groove__with__komal यांनी तो आपल्या अकाऊंटवर शेअर केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, "Last year jab me Mumbai gai thi, tb mujhe yeh खूबसूरत nazara dekhne ko mila jisse mujhe ehsas hua ki bhagwan ji k prati DEVOTION hi sb kuch hai." हा छोटासा कॅप्शन आणि भावनिक व्हिडीओ इतका प्रभावी ठरला की काही दिवसांतच तो लाखो लोकांनी पाहिला आणि शेअर केला.

advertisement

व्हिडीओखाली हजारो कमेंट्स आल्या. अनेकांनी या लहान मुलाच्या श्रद्धेचं कौतुक केलं, तर काहींनी देव म्हणजे नेमका काय हे या मुलाकडून शिकायला हवं असं म्हटलं. काही नेटकऱ्यांनी लोकेशन विचारलं, तेव्हा व्हिडीओ शेअर केलेल्या व्यक्तीनं ते लिंकिंग रोड, शास्त्री नगर, सांताक्रूझ वेस्ट (मुंबई) येथील असल्याचं सांगितलं.

या व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सगळ्यांना जाणवलं की, देवापर्यंत पोहोचण्यासाठी भव्य मंदिरं, सजावट किंवा श्रीमंती लागत नाही. खरी गरज असते ती मनापासूनच्या भक्तीची. या छोट्या मुलाने आपल्या निरागस श्रद्धेमुळे हे जगाला दाखवून दिलं.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
रस्त्यावरील छोटा भक्त, बाप्पासाठी डिव्हायडरवर उभारलं मंदिर, Video ने नेटकऱ्यांचं जिंकलं मन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल