TRENDING:

दीड वर्षांची मुलगी वडिलांच्याच ट्रकखाली चिरडली, मेंदूचा तुकडाही बाहेर आला; पण नंतर घडला चमत्कार

Last Updated:

Accident News : एक 20 महिन्यांची मुलगी, जिला चुकून तिच्या वडिलांच्या ट्रकने धडक दिली. अपघातात ती गंभीर जखमी झाली आणि तिचा मेंदूचा एक तुकडाही बाहेर आला. आई-वडील दोघंही घाबरले पण नंतर एक चमत्कार घडला जो तुम्हाला नक्कीच अविश्वसनीय वाटेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जगभरात दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात मरतात. काहींना तर किरकोळ दुखापत होते तरी त्यातून ते वाचत नाही. तर काही लोक भयानक अपघात होऊनही चमत्कारिकरित्या वाचतात आणि पूर्वीसारखेच त्यांचे जीवन जगतात. अशीच अपघाताची एक चमत्कारिक घटना. ज्यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले आहेत. एक 20 महिन्यांची मुलगी चुकून तिच्या वडिलांच्या ट्रकखाली चिरडली. तिच्या मेंदूचा एक तुकडादेखील बाहेर आला. पण पुढे जे घडलं ते अविश्वसनीय आहे.
News18
News18
advertisement

दक्षिण आफ्रिकेतील कोस्टर सिटी येथील ही घटना. शेतकरी असलेला शॉन स्टेन आणि त्याचा मुलगा जोशुआ ट्रकमध्ये चढले. शॉनची बायको केलीचं लक्ष क्षणभर विचलित झालं आणि त्यांची 20 महिन्यांची म्हणजे दीड वर्षांची मुलगी जना वडिलांच्या ट्रकच्या मागे गेली. शॉन ट्रक रिव्हर्स घेत होता. तेव्हा त्याला गाडी कशावर तरी आदळल्याचं जाणवलं. तो ट्रकमधून खाली उतरला, पाहतो तर काय, त्याची मुलगी. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

advertisement

अमेरिकन रॅपरला आवडली भारतीय कढी, 5000 किमीवरून ऑर्डर; डिलीव्हरीसाठीच 350000 रुपये, हवेतून पोहोचवली

शॉन म्हणाला. "तिच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता आणि मला तिच्या मेंदूचा एक तुकडा दिसत होता."

पॅरामेडिक्सने जानावर रस्त्याच्या कडेला उपचार केले आणि तिला पॉचेफस्ट्रूम हॉस्पिटलला नेलं. नंतर जोहान्सबर्गला एअरलिफ्ट करण्यात आलं, जिथं सर्जनने तिच्या डोक्याचं 4 तासांचं ऑपरेशन केलं.

advertisement

अनेक आठवडे ती एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये होती. तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशननंतर जनाला व्हेंटिलेटरवर बेशुद्ध अवस्थेत ठेवण्यात आलं. स्कॅनमध्ये डॉक्टरांना मेंदूला कोणताही गंभीर आघात आढळला नाही आणि ती चमत्कारिकरित्या बरी होऊ लागली. डॉक्टरांनी तिच्या बरं होण्याला एक असाधारण चमत्कार म्हटलं.

केली म्हणाली, "आमची मुलगी पहिल्यासारखी सामान्य नसेल, यासाठी आम्ही स्वतःला तयार केलं होतं. पण सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ती होती तशीच आहे.

advertisement

Spa मध्ये जाताय सावधान! प्रायव्हेट डिटेक्टिव्हने उघड केलं स्पाचं डार्क सीक्रेट, कुणालाच माहिती नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

आता जना हेलमेट घालते, कारण डॉक्टर तिची कवटी पूर्णपणे बरी होण्याची वाट पाहत आहेत. केली म्हणते, "ती हेल्मेट माझ्या अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारे हाताळते, मी तिला समजावून सांगते की तिच्या डोक्याचं रक्षण करण्यासाठी तिला ते घालण्याची गरज आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
दीड वर्षांची मुलगी वडिलांच्याच ट्रकखाली चिरडली, मेंदूचा तुकडाही बाहेर आला; पण नंतर घडला चमत्कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल