या सोहळ्यातून प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढालही झाली. फक्त व्यापारीच नाही तर यात्रेकरूंना नदी पार करून नेणारे नाविकही या सोहळ्यामुळे श्रीमंत झाले. तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण एका बोट चालवणाऱ्या कुटुंबाने या कुंभमेळ्यात तब्बल 30 कोटी रुपये कमावले आहेत. ही माहिती दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
advertisement
विधानसभेत अर्थसंकल्पाच्या चर्चेदरम्यान त्यांनी ही गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की 130 बोटी असलेल्या एकाच कुटुंबाने 45 दिवसात 30 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजे एका बोटीपासून त्यांना जवळपास 23 लाख रुपयांचा नफा झाला. जर आपण रोजच्या कमाईचा विचार केला तर ही रक्कम 50 ते 52 हजार रुपये होते. प्रयागराजमधील खलाशांना या निमित्ताने एक वेगळंच बळ मिळालं आहे.
या महाकुंभ मेळ्यासाठी 5 नवीन श्रद्धा कॉरिडॉर बांधण्यात आले होते. यामुळे संपूर्ण राज्याला फायदा झाला आहे. या पाचही कॉरिडॉरमुळे प्रयागराजचे विंध्यवासिनी धाम आणि काशी, अयोध्या आणि गोरखपूर, श्रृंगवेरपूर आणि लखनऊ-नैमिषारण्य, लालापूर, राजापूर आणि चित्रकूट तसेच मथुरा-वृंदावन आणि शुक्तिर्थ यासारख्या धार्मिक स्थळांशी थेट जोडले गेले. यामुळे भाविकांना प्रवास करणे सोपे झाले.
या महाकुंभ मेळ्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेची चांगली व्यवस्था होती. एकही छेडछाडीचा, अपहरणाचा, दरोड्याचा किंवा खुनाचा गुन्हा दाखल झालेला नसल्याचं देखील समोर आलं आहे.
