TRENDING:

बायकोसोबत हसत-हसत महाकुंभात गेला, एकत्र मारली डुबकी, पाण्याबाहेर रडत आला नवरा, घडलं काय?

Last Updated:

Husband search wife lost in mahakumbh : स्नान करण्यासाठी नवरा-बायकोने एकत्र संगमात डुबकी मारली. पण असं काहीतरी घडलं की पाण्याबाहेर येताच नवरा मात्र रडू लागला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रयागराज : महाकुंभाचा उत्सव सुरू आहे. लोकांची इथं प्रचंड गर्दी आहे. अजूनही लोक इथं जात आहे. कुणी एकट्याने, कुणी ग्रुपने तर कुणी जोडीने. असंच एक जोडपं कुंभमेळ्यात गेलं. नवरा-बायको दोघंही आनंदात कुंभमेळ्याला आले. हसत हसत पाण्यात उतरले.  स्नान करण्यासाठी त्यांनी एकत्र संगमात डुबकी मारली. पण पाण्याबाहेर येताच नवरा मात्र रडू लागला. असं नेमकं घडलं काय?
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
advertisement

आग्रा येथील बाह परिसरातील रहिवासी असलेले हे जोडपं महाकुंभात स्नान करण्यासाठी आलं होतं. चित्रहाटमधील सूरजनगर येथील कुर्ती सिंग भदौरिया आणि चंदावती या जोडप्याने एकमेकांचे हात धरून संगमात स्नान केलं. दोघांनी एकत्र डुबकी मारली. पण गर्दीत नवरा-बायकोने एकमेकांचा धरलेला हात सुटला. बायको गर्दीत हरवली, ती नवऱ्याला कुठेच दिसत नव्हती. पती त्याच्या इतर मित्रांसह पत्नीचा शोध घेत आहे, परंतु अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. आता तो त्याच्या बायकोला शोधत आहे.

advertisement

हिंदू तरुणाच्या 2 मुस्लिम बायका, नवऱ्यासोबत दोघीही महाकुंभला गेल्या आणि घडलं असं की...

उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं भव्य महाकुंभमेळ्यात कोट्यवधी भाविक येत आहेत. गर्दी असूनही, लोकांचा विश्वास कमी होत नाहीये. दररोज लाखो लोक त्रिवेणी संगमात स्नान करत आहेत. 13 जानेवारीपासून 40 कोटी भाविकांनी स्नान केलं आहे.

महाकुंभात येणाऱ्या लोकांची गणना कशी होते?

advertisement

महाकुंभाला लाखो-कोटींच्या गर्दीची मोजणी करणं कठीण आहे. महाकुंभात येणाऱ्या भाविकांची संख्या मोजण्यासाठी अंदाजासोबतच सीटक पद्धतदेखील वापरली जाते.

सांख्यिकीय पद्धतीने मोजणी : महाकुंभाला येणाऱ्या भाविकांची संख्या सांख्यिकीय पद्धतीने मोजली जाते. 2013 च्या कुंभमेळ्यात पहिल्यांदाच ही पद्धत वापरली गेली. सांख्यिकीय पद्धतीनुसार, एका व्यक्तीला गंगेत स्नान करण्यासाठी सुमारे 0.25 मीटर जागेची आवश्यकता असते आणि त्याला स्नान करण्यासाठी सुमारे 15 मिनिटं लागतील. सांख्यिकीय गणनेनुसार, एका तासात एका घाटावर जास्तीत जास्त 12,500 लोक स्नान करू शकतात. सध्या कुंभमेळ्यात एकूण 44 घाट बांधले गेले आहेत.

advertisement

परपुरुषासोबत लफडं, पतीने डिटेक्टिव्ह लावले, पण बायको चलाख खिलाडी, केला मोठा गेम

एआयचादेखील वापर : महाकुंभात येणाऱ्या लोकांची गणना करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. भाविकांची अचूक गणना करण्यासाठी महाकुंभात एआय तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय, रेल्वे स्थानकांवर उतरणाऱ्या भाविकांचा मागोवा घेतला जात आहे. हे कॅमेरे महाकुंभाला येणाऱ्या लोकांचे चेहरे स्कॅन करतात आणि तिथं उपस्थित असलेल्या गर्दीच्या आधारे, ते अंदाज लावतात की किती तासांत किती लाख लोक मेळाव्याच्या परिसरात आले. सध्या महाकुंभमेळा परिसरात 1800 कॅमेरे बसवले आहेत. एआयसोबतच, अधिकाऱ्यांकडून जमिनीच्या मूल्यांकनाद्वारे गर्दीचा आकार देखील निश्चित केला जातो.

advertisement

क्राउड असेसमेंट टीम : कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची संख्या मोजण्यासाठी सरकारने एक विशेष पथक स्थापन केलं आहे, ज्याचं नाव क्राउड असेसमेंट टीम आहे. ही टीम महाकुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांची रिअल टाइम आधारावर गणना करत आहे आणि एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने गणना करत आहे. याशिवाय, ड्रोन कॅमेरे प्रति चौरस मीटर घनता मोजतात आणि एकूण क्षेत्रफळानुसार लोकांची गणना करतात.

मराठी बातम्या/Viral/
बायकोसोबत हसत-हसत महाकुंभात गेला, एकत्र मारली डुबकी, पाण्याबाहेर रडत आला नवरा, घडलं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल