TRENDING:

Mahakumbh 2025 : आश्चर्यम! महाकुंभच्या चेंगराचेंगरीत मृत्यू, तेराव्याला जिवंत, कसा झाला चमत्कार?

Last Updated:

29 जानेवारी मौनी अमावस्येला महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गायब झालेली एक व्यक्ती स्वतःच्या तेराव्या दिवशी जिवंत घरी परतली आणि कुटुंबाला धक्काच बसला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रयागराज : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की ती पुन्हा जिवंत होत नाही हे आपल्याला माहिती आहे. पण महाकुंभच्या चेंगराचेंगरीत मृत झालेली एक व्यक्ती चक्क जिवंत झाली आहे. महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण त्याच्या तेराव्याला चमत्कार घडला. तेराव्यादिवशी ही व्यक्ती जिवंत झाली. ही घटना म्हणजे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही, असंच अनेकांना वाटतं आहे. पण हा चमत्कार नेमका घडला तरी कसा?
News18
News18
advertisement

29 जानेवारी मौनी अमावस्येला महाकुंभमध्ये अमृत स्नान होतं. या स्नानासाठी लाखो भाविक गेले. इथं इतकी गर्दी झाली की चेंगराचेंगरी झाली आणि कित्येक मृत्यू झाले. कुणी आपले वडील, कुणी आई, कुणी मुलगा, कुणी पती, कुणी पत्नी, कुणी भाऊ, कुणी बहीण गमावली. काही तर कुटुंबच्या कुटुंब गेले. प्रयागराजच्या झिरो रोड कुटुंबातील एक सदस्य ज्याचं नाव खुंटी गुरूसुद्धा या चेंगराचेंगरीत गेले असं त्यांच्या कुटुंबाला वाटलं आणि कुटुंबाने त्यांच्या तेराव्याची तयारी केली. पण तेराव्यालाच ते जिवंत दारात येऊन उभे राहिले.

advertisement

बायकोसोबत हसत-हसत महाकुंभात गेला, एकत्र मारली डुबकी, पाण्याबाहेर रडत आला नवरा, घडलं काय?

29 जानेवारी मौनी अमावस्येला खुंटी गुरू महाकुंभात स्नान करायला गेले होते. त्यानंतर कित्येक दिवस ते घरी आले नाही. महाकुंभच्या चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाल्याचं कुटुंबानं मानलं आणि त्यांचं कार्य घातलं. 11 फेब्रुवारी मंगळवारी त्यांचं तेरावं होतं. तेराव्याच्या दिवशीच खुंटी गुरू रिक्षातून घरी आले. त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला.

advertisement

खुंटी गुरू बेपत्ता झाले होते. चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला नव्हता. पण ते बरेच दिवस आले नाही म्हणून सगळयांनी त्यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला असावा असंच वाटलं.

महाकुंभात चेंगराचेंगरी कशी झाली?

रिपोर्टर रजनीश यादव यांनी कथन करताना सांगितलं की, रात्री 1 वाजण्याच्या सुमारास संगमाजवळ अचानक गर्दी वाढली. महाकुंभात स्नानासाठी 45 घाट बांधण्यात आले असले तरी लोक मुख्य संगमावरच स्नान करण्याचा आग्रह धरू लागले आहेत. त्यामुळे जमाव एकमेकांना ढकलत पुढे सरकू लागला. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तुटू लागले. काही वेळातच काही महिलांचा श्वास गुदमरून खाली पडू लागला. त्यामुळे चेंगराचेंगरी आणखी वाढली.

advertisement

काय आहे संगम नोज, महाकुंभात जिथं झाली चेंगराचेंगरी

प्रयागराजमध्ये संगम नोज स्नानासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. बहुतेक साधूसंत इथंच स्नान करतात. भाविकही इथंच स्नान करायला येतात. महाकुंभा स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. पण सगळ्यात जास्त गर्दी संगम नोजवरच पाहायला मिळते.

हिंदू तरुणाच्या 2 मुस्लिम बायका, नवऱ्यासोबत दोघीही महाकुंभला गेल्या आणि घडलं असं की...

advertisement

नाकासारख्या आकारामुळे याला संगम नोज असं म्हटलं जातं. असं म्हणतात की हे तेच ठिकाण आहे जिथं इथं यमुना आणि सरस्वती नद्या गंगेला मिळतात.

मराठी बातम्या/Viral/
Mahakumbh 2025 : आश्चर्यम! महाकुंभच्या चेंगराचेंगरीत मृत्यू, तेराव्याला जिवंत, कसा झाला चमत्कार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल