TRENDING:

मूल व्हावं म्हणून 14 वर्षे उपचार, पण डॉक्टरांनी नको तेच केलं, आयुष्यात कधीच बाप नाही होणार

Last Updated:

प्रसिद्ध डॉक्टरकडून उपचार घेऊनही पीडित तरुणाला अपेक्षित रिझल्ट न मिळाल्याने त्याने दुसऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधला. दुसऱ्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत धक्कादायक बाब उघड झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरामध्ये एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका  रुग्णावर 14 वर्षांपासून उपचार सुरू होते. संबंधित रुग्णावर औषधांचे इतके दुष्परिणाम झाले, की त्याच्या पदरी वंध्यत्व आलं. तो पिता होऊ शकणार नाही. या प्रकरणी सुनावणी करताना कोर्टाने डॉक्टरला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय खासगी रुग्णालयात सरकारी डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याबद्दल खासगी रुग्णालयालादेखील एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची संपूर्ण रक्कम 30 दिवसांत भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

लखनौमध्ये चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अरविंद गुप्ता असं या डॉक्टरचं नाव आहे. राज्य ग्राहक आयोगाच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दंडाच्या रकमेसोबतच खटल्यादरम्यान झालेल्या खर्चासाठी 25 हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. पीडित रुग्णाला नऊ टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम 30 दिवसांत दिली जावी, असं कोर्टाने म्हटलं आहे.

advertisement

Weird Disease : हा असा कसा आजार! आईवडिलांसोबत जेवूच शकत नाही मुलगा

जौनपूरमधल्या पीडित व्यक्तीने ग्राहक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. या व्यक्तीने लग्नानंतर मूल होण्यासाठी 14 वर्षं नामवंत डॉक्टरांकडून उपचार घेतले होते. पीडित व्यक्तीने याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, तो प्रयागराजच्या डॉ. अरविंद गुप्ता यांच्याकडून फिनिक्स रुग्णालयात उपचार घेत होता. डॉ. अरविंद गुप्ता हे प्रयागराजमधल्या मोतिलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये नेफ्रोलॉजीचे प्राध्यापक होते. गुप्ता यांनी फिनिक्स हॉस्पिटलसह अनेक संस्थांमध्ये प्रॅक्टिस केली आहे. उपचारांदरम्यान त्यांनी पीडित व्यक्तीला हॉर्मोन्सची अनेक इंजेक्शन्स दिली होती.

advertisement

उपचार घेऊनही पीडित तरुणाला अपेक्षित रिझल्ट न मिळाल्याने त्याने दुसऱ्या डॉक्टरांशी संपर्क साधला. दुसऱ्या डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत धक्कादायक बाब उघड झाली. डॉक्टर अरविंद गुप्ता यांनी केलेल्या उपचारामुळे पीडित तरुणाचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं. डॉ. गुप्तांनी केलेल्या उपचारांच्या दुष्परिणामांमुळे पीडित तरुण पिता होण्याची शक्यता मावळली आहे.

'डॉक्टर कोमात विद्यार्थी जोमात'; डॉक्टर कोण आहे? या प्रश्नाचं दिलं असं उत्तर, फोटो सोशल मीडियावर Viral

advertisement

आजकाल अनेक जोडप्यांना नैसर्गिकरीत्या मुलं होण्यात अडचणी येत आहेत. अशी जोडपी वंध्यत्व निवारण तज्ज्ञांची मदत घेतात; मात्र उपचार योग्य प्रकारे केले गेले नाहीत, तर त्यांचे भयंकर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. लखनौमधल्या तरुणाच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे.

मराठी बातम्या/Viral/
मूल व्हावं म्हणून 14 वर्षे उपचार, पण डॉक्टरांनी नको तेच केलं, आयुष्यात कधीच बाप नाही होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल