'डॉक्टर कोमात विद्यार्थी जोमात'; डॉक्टर कोण आहे? या प्रश्नाचं दिलं असं उत्तर, फोटो सोशल मीडियावर Viral
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हा एक फोटो आहे जो एका विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेचा आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याने एका शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचं असं काही भन्नाट उत्तर दिलं आहे, जे वाचून तुम्ही पोट धरुन हसाल.
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय दिसेल याचा नेम नाही. इथे दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी धक्कादायक असतात. असाच एक फोटो समोर आला आहे जो तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडेल.
हा एक फोटो आहे जो एका विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेचा आहे. त्यामध्ये विद्यार्थ्याने एका शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नाचं असं काही भन्नाट उत्तर दिलं आहे, जे वाचून तुम्ही पोट धरुन हसाल.
एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने "डॉक्टर कोण आहे?" या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे. जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्याने लिहिले की, "डॉक्टर असा असतो जो तुम्हाला औषध देऊन तुमच्या आजार किंवा रोगाला मारतो आणि नंतर बिल देऊन लोकांना मारतो." हे उत्तर इतके हास्यास्पदरीत्या अचूक होते की लोक त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
advertisement
सोशल मीडियावर या उत्तराबाबत लोक म्हणत आहेत की विद्यार्थ्याने कोणालाही हसू येईल अशा पद्धतीने सत्य सांगितले आहे.
Itna sach bro 😭 pic.twitter.com/Ws0XicKEOD
— Vishal (@VishalMalvi_) December 22, 2024
विशेष म्हणजे या उत्तरासाठी शिक्षकाने विद्यार्थ्याला 'पाच पैकी पूर्ण पाच गुण' दिले आहेत. एवढेच नाही तर शिक्षकाने उत्तराच्या खाली एक स्मायली इमोजी बनवली आणि लिहिले, 'खूप चांगला विद्यार्थी.' या उत्तरपत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
पोस्ट पाहून यूजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट केली की, "खरेच ही मुले आजच्या काळातील खरी फिलॉसॉफर आहेत." दुसऱ्या युजरने लिहिले, "शिक्षकाने अगदी बरोबर केले, 5 पैकी 5 गुण मिळाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 27, 2024 10:02 PM IST
मराठी बातम्या/Viral/
'डॉक्टर कोमात विद्यार्थी जोमात'; डॉक्टर कोण आहे? या प्रश्नाचं दिलं असं उत्तर, फोटो सोशल मीडियावर Viral