TRENDING:

धक्कादायक! बायको माहेरी गेल्याने नवऱ्याचा मृत्यू; एक दिवसही सहन झाला नाही विरह, गेला जीव

Last Updated:

शुक्रवारी पत्नी माहेरी गेली आणि तिच्यापासून दूर झाल्यानंतर शनिवारी पतीनं टोकाचं पाऊल उचललं, यामुळे संपूर्ण कुटुंब हादरलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदयपूर : 'अहो, मी माहेरी जाते आहे', पत्नीनं असं म्हणताच पती खूश. पण हा आनंद काही दिवसांचाच. पत्नी माहेरी गेल्यानंतर काही दिवसांनी पत्नी माहेरी गेल्याचा आनंद होणाऱ्या पतीलाच घर नकोसं वाटतं. कधी बायको परत येते, असं होतं. किंबहुना ते स्वतःच तिला माहेरी आणायला जातात. अशीच एक व्यक्ती ज्याची पत्नी माहेरी गेली पण त्याला एक दिवसही विरह सहन झाला नाही आणि त्याचा मृत्यू झाला. राजस्थानमधील ही हृदयद्रावक घटना आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

उदयपूर जिल्ह्यातील गोगुंडा परिसरातील छिपला येथील नया भिलवाडा कॉलनीत राहणारा चेनाराम गमेती. ज्याची पत्नी शुक्रवारी जोगी का गुडा इथं गेली होती. याच दिवशी चेनाराम खूप विचित्र वागत असल्याचं त्याच्या कुटुंबानं सांगितलं. तो कुणाशीच बोलत नव्हता, गप्प गप्पच होता. यानंतर रात्री उशिरा तो त्याच्या खोलीत झोपायला गेला मात्र सकाळी बाहेर आलाच नाही.

advertisement

लटकलेल्या अवस्थेत आढळला

अजूनही मुलगा खोलीबाहेर आला नाही म्हणून कुटुंबाला काळजी वाटू लागली. त्यांनी कसंबसं करून खोलीचा दरवाजा उघडला आणि समोरील दृश्य पाहून त्यांच्या काळजात धस्सं झालं. चेनाराम खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पत्नी माहेरी गेल्यानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचललं.

Chanakya Niti : सुंदर बायको म्हणजे नवऱ्यासाठी संकट; आचार्य चाणक्य का म्हणाले असं?

advertisement

पत्नीपासून वेगळं झाल्यानं पतीची आत्महत्या

पत्नी दूर गेली, हा विरह चेनारामला सहन झाला नाही. त्यामुळे त्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. उदयपूरच्या गोगुंडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी मृतदेहाचे पोस्टमार्टम करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेनारामने शुक्रवारी रात्री उशिरा गळफास लावून घेतला होता. सुरुवातीला पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे ही आत्महत्या असल्याचं मानलं जात आहे. मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

advertisement

पतीचा अपघातात मृत्यू, पत्नीनं काही तासात संपवलं आयुष्य

काही दिवसांपूर्वीच नांदेडमध्येही अशीच धक्कादायक घटना घडली होती.  पतीचे अपघातात निधन झाल्याचं ऐकताच धक्का बसलेल्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहा बेंद्रीकर असं आत्महत्या केलेल्या पत्नीचं नाव आहे. तिचा पती अरुण शनिवारी रात्री घरी परतताना अपघातात त्याचा मृत्यू झाला.

चॉकलेट खाल्ल्यामुळे होऊ लागल्या रक्ताच्या उलट्या; 2 लहान मुलींची प्रकृती बिघडली, नेमकं काय घडलं?

advertisement

अरुण विष्णुपुरी इथून घरी परत येत होते. त्याच्या दुचाकीला कहाळा-गडगा इथं अज्ञात वाहनानं धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अरुणचा मृत्यू झाला. त्याच्या खिशात असणाऱ्या ओळखपत्राच्या आधारे माहिती घेऊन पत्नीला याबाबत सांगण्यात आलं.

मराठी बातम्या/Viral/
धक्कादायक! बायको माहेरी गेल्याने नवऱ्याचा मृत्यू; एक दिवसही सहन झाला नाही विरह, गेला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल