TRENDING:

गावात ठेवली लग्नाची पार्टी, हजार लोकांना दिलं आमंत्रण, पण या कारणामुळे आला नाही एकही माणूस

Last Updated:

आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल की असं का? नक्की काय घडलं असावं? चला या प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 30 नोव्हेंबर : आनंद वाटून घेतल्याने वाढतो असं लोक म्हणत असताना तुम्ही ऐकलं असेल. त्यामुळे लग्ना कार्याला लोक आवर्जून सगळ्यांना आमंत्रण देतात. जवळचा, लांबचा सगळ्याच लोकांना लग्नासाठी बोलावलं जातं. चार लोक आले बोलणं झालं की माणसाला आनंद होतो आणि आयुष्यात आपण इतके लोक आणि नाती जमा केली याचं समाधान देखील वाटतं.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण एका व्यक्तीसोबत एक विचित्र प्रकार घडला, ज्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत आहे. खरंतर या व्यक्तीने हजारो लोकांना आपल्या घरच्या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं होतं. पण असं असलं तरी कोणीही त्याच्या कार्यक्रमाला आलं नाही. या मागचं कारण देखील तसंच आहे.

आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्न येईल की असं का? नक्की काय घडलं असावं? चला या प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या लग्नाची पार्टी आयोजित केली होती. तो माणूस त्याच्या संपूर्ण कुटुंबासह गावाबाहेर राहत होता. पण लग्नासाठी त्याने आपले गाव निवडले. त्या व्यक्तीने सर्वांना तोंडी घरी येण्याचे आमंत्रण दिले. लग्नाच्या दिवशी त्यांनी एका मोठ्या मैदानात सर्व व्यवस्था केली. सुमारे शंभर टेबल्स लावण्यात आले आणि हजार लोकांसाठी जेवण तयार करण्यात आले. मात्र गावातील एकही व्यक्ती लग्नाला आली नाही. मुलाच्या आईने कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनाच धक्का बसला.

advertisement

या लग्नाची बातमी चीनी मीडिया HK01 वर दाखवण्यात आली. रिकाम्या शेतात शंभर टेबल्स धूळ खात असताना दिसत आहे. पाहुण्यांसाठी बसण्यापासून ते स्वादिष्ट भोजनापर्यंतची व्यवस्था करण्यात आली होती. पण लग्नाला कोणी आले नाही. जेव्हा वराच्या आईने याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला कळले की, तिचे कुटुंबीय गावात कोणाच्या घरी झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते, त्यामुळेच त्यांनीही तिच्या घरी लग्नाला हजेरी लावली नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

या लग्नात तिला खूप त्रास सहन करावा लागल्याचे वराच्या आईने सांगितले. एक तर अन्नाचीही नासाडी झाली आणि दुसरे म्हणजे त्यांची बदनामीही झाली. या लग्नात आपल्या हजारो पाहुण्यांपैकी एकही पाहुणे सहभागी होणार नाही याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.

मराठी बातम्या/Viral/
गावात ठेवली लग्नाची पार्टी, हजार लोकांना दिलं आमंत्रण, पण या कारणामुळे आला नाही एकही माणूस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल