ऑफिस म्हणजे तिथं सण साजरे होतात, पूजा होते. अशाच एका ऑफिसमधील कार्यक्रमाचा हा व्हिडीओ. व्हिडीओत तुम्ही ऑफिसला फुलांची आणि लायटिंगची सजावट केलेली पाहाल तसंच कंदीलही लावण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सगळे लोक ट्रेडिशनल ड्रेसमध्ये आहेत. यावरून हा व्हिडीओ दिवाळीतील असावा.
त्यानंतर दोन पुरुष कर्मचारी एका ग्लासमध्ये लिंबाचा रस पिळताना दिसतात. त्यापैकी एक जण लिंबू रस असलेला हा ग्लास घेऊन संपूर्ण ऑफिसमध्ये फिरतो. हातात ग्लास आणि चमचा म्हटलं की बहुतेकांना ते तीर्थ किंवा पंचामृत आहे असं वाटणं साहजिकच आहे. चमच्याने तो प्रत्येकाला लिंबू रस देतो. पण तो ते अशा पद्धतीन वाटतो जणू तीर्थच देत आहे. त्यामुळे ऑफिसमधील कर्मचारीही अगदी श्रद्धेने हातावर हात ठेवून त्याची ओंजळी करून तीर्थ घ्यावं तसं ते घेतात.
advertisement
पण जसं ते तीर्थ म्हणून दिलेला हा लिंबू रस पितात तेव्हा सगळ्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. कुणी डोळे मिचकावतं, कुणी तोंड वाकडं करतं, तर कुणी फेकून देतं, तर कुणी ते थुंकण्यासाठी किंवा चूळ भऱण्यासाठी बाथरूमकडे धाव घेताना दिसतं.
हा ऑफिसमधील एक प्रँक व्हिडीओ आहे. @eazyonesources नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये प्रसाद म्हणून लिंबू रस दिल्याचं सांगण्यात आलं आहे. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि लाइक केला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. एका युझरने आता ऑफिसमध्ये कुणी प्रसादाचं नाव काढणार नाही असं म्हटलं आहे.तर एका युझरने हे मॅनेजर आणि एचआरलाही द्या असं म्हटलं आहे. कुणी व्हिडीओत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या रिअॅक्शनवरही कमेंट केली आहे. पहिली प्रतिक्रिया खूप छान असल्याचं म्हटलं आहे.
तुम्हाला हा प्रँक कसा वाटला? आणि कोणत्या कर्मचाऱ्याची रिअॅक्शन बेस्ट वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
