प्रपोज करताना ठिकाण आणि वेळही महत्त्वाची असते. आपण कधी आणि कुठे प्रपोज करतो, यावरही समोरच्याचा होकार, नकार, उत्तर अवलंबून असतं. त्यामुळे तरुण तरुणीला प्रपोज करताना एखादं खास ठिकाण शोधतात. या तरुणाने असं ठिकाण शोधलं ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल, ते म्हणजे धबधबा.
VIDEO : अर्रर्रर्र! डॉक्टर डॉक्टर खेळता खेळता हे काय करून बसला, चिमुकला स्वतःही धक्क्यात
advertisement
धब्याधब्याच्या आत उभं राहून या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. पण म्हणतात ना प्रेमात पाय घसरतो, तसंच या तरुणासोबत घडलं. त्याने गर्लफ्रेंडला प्रपोज करतातच पाण्यात त्याचा पाय घसरला आणि तो धबधब्यात वाहून गेला.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक तरुण आणि तरुण दोघं धबधब्याच्या पाण्यात उभे आहेत. तरुणी पाठमोरी आहे. तरुण तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचं लक्ष आपल्याकडे वेधतो आणि तो गुडघ्यावर बसून अंगठी देऊन प्रपोज करतो. पण गर्लफ्रेंडचं उत्तर मिळण्याआधीच त्याचा पाय घसरतो आणि तो धबधब्याच्या पाण्यात वाहत जातो.
व्हिडीओ पाहून सगळ्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी हा तरुण जिवंत आहे की नाही असं विचारलं आहे. व्हिडीओ तुम्ही पाहाल तर त्यावर माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदी दिवस, असं कॅप्शन आहे. तसंच एका युझरने ग्रोकवर हा प्रश्न उपस्थत केला तेव्हा ग्रोकनेही हा तरुण जिवंत असल्याचं सांगितलं आहे. तसंच या व्हिडीबाबत सविस्तर माहितीही दिली आहे.
ग्रोकने दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य जेमिकामध्ये डुन्स रिव्हरफॉल येथील आहे. जिथं अनेक जण घसरतात पण ते क्वचितच जीवघेणं ठरतं. या व्हिडीओतील व्यक्तीच नाव जेमी आहे. या व्यक्तीला वाचवण्यात आलं आहे, त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
कुणी 20 वर्षांनी मोठी, कुणी विवाहित! 'भाभीजी'च्या प्रेमात का पडत आहेत तरुण, नात्याचा शेवट मृत्यू
दरम्यान न्यूज18मराठीने या माहितीची पुष्टी केलेली नाही. @MarchUnofficial या एक्स अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. काही युझर्सनी याला कलयुगी मोहब्बत म्हटलं आहे. तर काहींनी हे साहस नव्हे मूर्खपणा होता, जीवाची किंमत लावून प्रपोज करण्यात अर्थ काय, प्रेम माणसाला धोकादायक ठिकाणी नेते, अशा ठिकाणी सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे, अशा कमेंट केल्या आहेत. तर काही युझर्सनी गर्लफ्रेंडने त्याला वाचवण्याचा प्रयत्न न करण्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.