अशीच एक भीतीदायक पण रंजक गोष्ट सोशल मीडियावर एका व्यक्तीने शेअर केली आहे. त्याने आपल्या जुन्या घरात काही अनोख्या आणि अजब घटना अनुभवल्या, ज्या ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
त्या व्यक्तीने सांगितलं की तो आणि त्याचे काही मित्र मिळून 155 वर्ष जुनं घर भाड्याने घेतलं होतं. पहिल्या काही दिवसांत सगळं सुरळीत होतं, पण रात्रीच्या वेळी घरात अजब आवाज येऊ लागले. पायऱ्यावर कोणीतरी चालतंय, दरवाजे हलण्याचा आणि भिंतींवर कोणीतरी चालल्यासारखा आवाज. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण एका रात्री त्यांनी घराच्या कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीची सावली पाहिली. सगळेच थबकले, कारण पुढच्याच क्षणी तो कोपरा रिकामा होता.
advertisement
त्या घटनेनंतर सगळ्यांचा संशय पक्का झाला. घरात त्यांच्याशिवाय आणखी कोणी आहे का? दररोज काहीतरी हालचाल, पावलांचे आवाज, आणि दरवाज्याजवळ कोणीतरी उभं असल्याचा भास त्यांना होऊ लागला.
हा कहाणी शेअर केल्यानंतर एका यूजरने तर आपल्या 1870 च्या काळात बांधलेल्या घराचा अनुभव सांगितला. जिथे रात्री विचित्र आवाज, सावल्या आणि अचानक उघडणारे दरवाजे दिसायचे. त्याने सांगितलं, "काल रात्री आम्हाला अंधाऱ्या कोपऱ्यात कोणीतरी उभं दिसलं, पण क्षणात गायब झालं. आम्हाला कळलंच नाही की ते काय होतं."
अशा जुन्या घरांमध्ये अनेक आठवणी, इतिहास आणि काही न सांगता येणाऱ्या घटना दडलेल्या असतात. काही लोक या गोष्टींना सत्य मानतात, तर काहींच्या मते हे सगळं मनाचे खेळ असतात.