पतीने धुडकावली ऑफर
जोडप्यामध्ये वारंवार भांडण होत असल्यामुळे, कुटुंबातील सदस्यांनी प्रकरण सोडवण्यासाठी पंचायत बोलावली. तेथे, वडीलधारी माणसं आणि ग्रामस्थांसमोर, महिलेने उघडपणे तिचा निर्णय जाहीर केला आणि आग्रह केला की ती तिचा वेळ पती आणि तिच्या प्रियकरामध्ये समान वाटून घेईल. महिलेची ही मागणी ऐकून पतीला धक्का बसला आणि त्याने 'मला माफ कर, जा आणि तुझ्या प्रियकरासोबत राहा,' असं भर सभेत पत्नीला सांगितलं.
advertisement
उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. अझीमनगर आणि तांडा पोलीस ठाण्यांच्या हत्तीत येणाऱ्या गावांमध्ये हा सगळा प्रकार झाला आहे. अझीमनगरमधील एका तरुणीचे लग्न दीड वर्षांपूर्वी शेजारच्या गावातील पुरुषासोबत झाले होते. लग्नानंतर तिचे लगेचच तांडा परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले, यानंतर महिला प्रियकरासोबत पळून गेली. प्रत्येक वेळी महिलेचा पती तिला घरी घेऊन यायचा, पण महिला 10 वेळा प्रियकरासोबत पळून गेली.
अलिकडेच महिला पुन्हा एकदा प्रियकराकडे गेली, तेव्हाही पती तिला घ्यायला गेला, पण तिने पतीसोबत यायला नकार दिला, त्यामुळे कुटुंबाला नाईलाजाने पंचायत बोलवायला लागली. पंचायत बसल्यानंतर महिलेने 15-15 दिवस पती आणि बॉयफ्रेंडसोबत राहण्याची परवानगी मागितली, पण या मागणीचा विचार तरी कसा करता येईल? असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला. तर पतीने आता आपल्याला पत्नीसोबत संबध ठेवायचे नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे, पण महिला दोघांनाही वेळ द्यायच्या तिच्या भूमिकेवर ठाम आहे.
