आपल्याला 7 जन्मी हाच पती मिळावा, त्याला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना वटपौर्णिमेला महिला करतात. पण पुरुषांनी त्याआधी पिंपळपौर्णिमा साजरी करत कावळापूजन करत याच्या उलट प्रार्थना केली आहे. पुरुषांनी पिंपळाला फेऱ्या मारल्या आहेत. बायकोच्या त्रासाला कंटाळून पत्नीपीडित पुरुषांनी हे पाऊल उचललं आहे.
Happy Vat Purnima 2025 Wishes : सण सौभाग्याचा, सुवासिनींना द्या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
advertisement
महिलांकडून होणारे अत्याचार, महिलांकडून होणारा त्रास पुरुष कुठेच सांगू शकत नाही आणि अशा घटना मोठ्या वाढल्या आहेत.
यामुळे छत्रपती संभाजी नगरातील पत्नीपीडित पुरुष आश्रमाने ही बायको सात जन्म काय तर सात सेकंदही नको असे म्हणत पिंपळाला फेऱ्या मारत कावळ्याचे पूजन केलं आहे. त्रास देणाऱ्या बायकांचा विरोध केला आहे. पिंपळाला फेरी मारून त्रास देणारी बायको सात जन्म तर काय 7 सेकंदही नको यासाठी पत्नीपीडित पुरुषांनी प्रदक्षिणा मारल्या.