अमेरिकेतील मेरीलँड येथील बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप. केव्हज व्हॅली गोल्फ क्लबमध्ये स्पर्धा सुरू होती. ही स्पर्धा फक्त एका शॉटमुळे ऐतिहासिक ठरली. अंतिम फेरीत ब्रिटिश गोल्फर टॉमी फ्लीटवुडने सात अंडरने सुरुवात केली आणि पार 4 सेकंदाच्या होलवर बर्डी केली. त्याचा शॉट जोरदार होता, पण बॉल होलच्या अगदी जवळ थांबला. टॉमीला वाटलं की आता तो सामना हरला, पण नंतर एक चमत्कार घडला.
advertisement
बोंबला! प्रायव्हेट पार्टचा आकार वाढवायला गेला पुरुष, सर्जरीदरम्यान डॉक्टरांकडून मोठी चूक
होलजवळ अडकलेल्या बॉलजवळ एक माशी उडत आली आणि ती त्या बॉलवर बसली. माशी जशी त्या बॉलवर सरकू लागली तसा बॉल हलला आणि तो थेट होलमध्ये जाऊन पडला. पीडीएच्या 10 सेकंदांच्या नियमानुसार टॉमीला विजेता घोषित करण्यात आलं.
त्यावेळी माशी दिसली नव्हती. पण जेव्हा कॅमेरा फुटेज बारकाईने रिप्ले केलं गेलं तेव्हा माशी बॉलवर बसलेली दिसली. त्याचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Plane Secret : विमानात स्मोकिंगला बंदी, मग अॅशट्रे का असतो? एअर हॉस्टेसने केला शॉकिंग खुलासा
माशीमुळे गोल्फरने केवळ बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप जिंकली नाही तर 20 लाख डॉलर्स सुमारे 17 कोटी रुपयांचं बक्षीसदेखील जिंकलं. किमान सोशल मीडियावर तरी गोल्फर टॉमी फ्लीटवुडच्या विजयाचं श्रेय या माशीला दिलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.