TRENDING:

जगातील सर्वात धोकादायक वनस्पती, ज्याच्या पानांना स्पर्श करताच जाऊ शकतो जीव!

Last Updated:

जगभरात अनेक वेगवेगळी झाडे, वनस्पती असतात. प्रत्येक झाडाचं एक वेगळं महत्त्व, विशेषतः असते. काही झाडं आरोग्यदायी असतात तर काही धोकादायक.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : जगभरात अनेक वेगवेगळी झाडे, वनस्पती असतात. प्रत्येक झाडाचं एक वेगळं महत्त्व, विशेषतः असते. काही झाडं आरोग्यदायी असतात तर काही धोकादायक. असंच एक धोकादायक झाड ज्याला हात लावला तरी जीवावर बेतू शकतं, याविषयी तुम्हाला माहितीय का?
जगातील सर्वात धोकादायक वनस्पती
जगातील सर्वात धोकादायक वनस्पती
advertisement

या धोकादायक वनस्पतीचं नाव गिम्पी आहे. या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव डेंड्रोकनाइड मोरॉइड्स आहे. ही वनस्पती दिसायला अतिशय आकर्षक दिसते. त्याची पाने हृदयाच्या आकाराची असतात. पण चुकूनही या रोपाला कोणी हात लावला तर त्या व्यक्तीला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. वेदना असह्य झाल्यावर व्यक्तीला जीवही गमवावा लागू शकतो.

या वनस्पतीच्या पानांच्या वरच्या बाजूला लहान काटे असतात. जे दिसत नाहीत पण फारच धोकादायक आहे. पानांना स्पर्श करताच ते त्वचेत शिरतात आणि पुन्हा बाहेर येईपर्यंत वेदना देत राहतात. या वनस्पतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

@sciencetvhindi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही वनस्पती प्रकर्षानं ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच खळबळ उडवत आहे. व्हिडीओवर अनेक कमेंटही पहायला मिळत आहे. ही वनस्पती अद्याप भारतात आढळली नाही.

मराठी बातम्या/Viral/
जगातील सर्वात धोकादायक वनस्पती, ज्याच्या पानांना स्पर्श करताच जाऊ शकतो जीव!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल