अमेरिकेतून एक घटना समोर आली आहे. एक महिलेची मुलगी पाच वर्षांपासून कोमात होती. महिला रोज मुलीसाठी हॉस्पिटलला जायची, या आशेनं की, आपली मुलगी एक दिवस तरी नक्की कोमातून बाहेर येईल. हा क्षण आला मात्र यावेळी मुलगी कोमातून बाहेर आल्यावर आई मात्र घाबरली.
मिशिगनची जेनिफर फ्लेवेलेन कार अपघातानंतर चार वर्षे 11 महिने कोमात गेली होती. पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला डोळ्यासमोर तिची आई दिसली. मात्र महिलेला आपली मुलगी अशा प्रकारे कोमातून बाहेर येईल याची अपेक्षा नव्हती.
advertisement
Viral Video : भररस्त्यात टॅंकरचा अपघात, पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी लोकांची तुंबड गर्दी
Unilad च्या रिपोर्टनुसार, 25 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या भीषण कार अपघातानंतर जेनिफर कोमात गेली. तेव्हा तिचं वय 36 वर्षे होतं. जेनिफरची आई आणि तिची मुलं रोज यायची आणि तिला जोक सांगायची आणि घराशी संबंधित गोष्टींबद्दल सांगायच्या. रोज ते या गोष्टी करायच्या, जेणेकरुन जेनिफर कधी ना कधी कोमातून बाहेर येईल. वयाच्या 41 व्या वर्षी मुलगी अचानक कोमातून जागी झाली आणि जोरजोरात हसायला लागली. डॉक्टरांनी मुलीच्या आईला पेगीला सांगितलं की तिच्या मुलीने त्यांच्या विनोदांवर रिअॅक्ट केलंय.
जेनिफरचे डॉ. राल्फ वांग म्हणाले, हा चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण, हे फक्त 1-2% रुग्णांमध्येच घडतं. पेगी म्हणाली, कोमात पडलेल्या माझ्या मुलीचे हसणे ऐकून मला आश्चर्य वाटलं, कारण मी तिचा आवाज बराच काळ ऐकला नव्हता. जेनिफरला जाग आली तेव्हा तिचं हसणं ऐकून मी खूप घाबरले होते.