मुंबई: एखादा माणूस पुतळा बनला आहे आणि तो लोकांचे मनोरंजन करतोय, हे परदेशातील चित्र आपण सोशल मीडियातून पाहिलं असेल. पण आपल्या मुंबईतही असा एक गोल्डन मॅन आहे. तो गेल्या काही काळापासून मुंबईकरांचं मनोरंजन करतोय. विशेष म्हणजे नोकरती मन रमत नव्हतं म्हणून सरळ नोकरी सोडली अन् आपल्या आवडीच्या केलेला प्राधान्य दिलं. लॉकडाऊनमध्ये घातलेल्या मास्कमुळे स्वप्नील खेडकर या मराठी मुलाला नवी ओळख मिळाली आहे. लोकल18 सोबत बोलताना स्वप्नीलनं आपला प्रवासच सांगितला आहे.
advertisement
दादरमध्ये गोल्डन मॅनचा लूक करून उभा राहिलेला मुलगा अनेकांनी पाहिला असेल. हा मुलगा एखादा फॉरेनर नाही तर आपला मराठमोळा मुंबईकर स्वप्निल खेडेकर आहे. तो सलग अनेक तास पुतळा म्हणून उभा राहत लोकांचे मनोरंजन करतो. त्याच्यासमोर ठेवलेल्या डोनेशन बॉक्समध्ये पडलेल्या पैशांनी तो गरिबांना मदत सुद्धा करतो. लहान मुलं आणि पालक आवर्जून त्याला पाहण्यासाठी शिवाजी पार्कला येतात.
73 वर्षांच्या आजींच्या हातात जादू! बालपणीचा छंद आता कमाईचं साधन, बांबूच्या वस्तूंना मोठी मागणी
लॉकडाऊनमध्ये घातला मास्क
स्वप्निलने आपल्या या खास कलेचं कुठंही शिक्षण घेतलेलं नाही. दहावीचं शिक्षण घेतल्यानंतर काही कोर्स केले आणि नोकरी पकडली. परंतु, नोकरीत मन रमत नव्हतं. त्यात लॉकडाऊन काळात मास्क घालून लोकांचे मनोरंजन केले. लोकांना ते आवडले. तेव्हापासून आपली कलाच जोपासण्याचा निर्णय घेतला, असं स्वप्नील सांगतो. त्याच्याकडे असणारी कला पुतळा बनण्याची कला खरोखर विलक्षण आहे. अनेकांना तर तो पुतळा आहे की माणूस यामध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळेच स्वप्नील हा आता दादरच्या लहान मुलांचा आवडीचा गोल्डन मॅन झाला आहे.
5 वर्षांपासून करतोय मनोरंजन
“मी गेले पाच वर्ष या कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहे. मी लॉकडाउनच्या आधी जर्मनीच्या आर्टिस्टचे काही व्हिडिओज पाहिले होते. तिलाच आदर्श मानून मी लॉकडाऊन मध्ये लोकांचं मनोरंजन करायला सुरुवात केली. सुरुवातीचा काळ थोडा अवघड असला तरी आता मात्र दादरकरांच मला भरभरून प्रेम मिळत आहे, असं स्वप्नील सांगतो. इंग्लडमध्ये जाऊन आपली कला सादर करण्याचं त्याचं स्वप्न आहे.