आज आम्ही तुम्हाला अशा एका जमातीबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यासाठी टॅटू हे सुरक्षित राहण्याचे साधन होते. म्यानमारच्या या जमातीतील महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत आणि त्यामागचे कारण असे आहे की तुम्हाला याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल.
पश्चिम म्यानमारच्या चिन राज्यातील लाइ तू चिन जमातीच्या महिला जगभर प्रसिद्ध आहेत. कारण या महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत. यात नवल ते काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. आज भारतात आणि परदेशातील स्त्रिया फॅशनच्या निमित्ताने चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर अवयवांवर टॅटू बनवतात. खरं तर, अनेक महिलांनी त्यांच्या संपूर्ण शरीरावर टॅटू बनवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पण इथल्या महिलांच्या चेहऱ्यावरील टॅटूची कहाणी खूप आश्चर्यकारक आहे.
advertisement
इथे मुलगी तरुण होताच वडीलच करतात तिच्यासोबत लग्न, बापासोबतच संसार करते लेक, विचित्र प्रथा
चिन लोकांच्या समजुतीनुसार, एकदा एक बर्मी राजा या भागात आला होता. त्याला येथील महिला अतिशय आकर्षक वाटल्या. यामुळे त्याने एका महिलेला आपली राणी बनवण्यासाठी तिचं अपहरण केलं. या घटनेने चिन लोक घाबरले आणि त्यांनी आपल्या मुलींच्या चेहऱ्यावर गोंदवलं. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. आणखी एका मान्यतेनुसार, येथील महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू बनवले गेले जेणेकरून त्या सुंदर आणि परिसरातील इतर जमातींपेक्षा वेगळ्या दिसाव्यात. यामुळे इतर जमातीचे लोक इतर या महिलांचं अपहरण करणार नाहीत, असा विश्वास त्यांना होता. तिसरी श्रद्धा धर्माशी संबंधित आहे. ब्रिटीश साम्राज्याच्या स्थापनेनंतर चिन अल्पसंख्याकांचे ख्रिश्चन धर्मात रूपांतर झालं. ज्यांच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत अशा ख्रिश्चनांनाच स्वर्ग मिळेल, असं आश्वासन त्यांना देण्यात आले.
पती हजारोवेळा पत्नीच्या शरीरावर गोंदवतो 'हे' एकच नाव; भारतातील या अनोख्या जमातीबद्दल माहितीये का?
1960 च्या दशकात बर्माच्या समाजवादी सरकारने चेहरा टॅटू अमानवी असल्याचं घोषित करून त्यावर बंदी घातली होती. त्यामुळे पूर्वीच्या काळातील महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू दिसतात. सध्या या भागात टॅटू काढणारी वृद्ध पिढी ही शेवटची पिढी आहे. यानंतर ही प्रथा येथून पूर्णपणे नाहीशी होईल.