इथे मुलगी तरुण होताच वडीलच करतात तिच्यासोबत लग्न, बापासोबतच संसार करते लेक, विचित्र प्रथा

Last Updated:

सहसा वडिलांना मिठी मारताच मुलीला सर्वात सुरक्षित वाटतं, मात्र इथल्या मुलींना त्याच बापाची भीती वाटते. यामागील कारणही खूप भीतीदायक आहे

लग्नाची अजब प्रथा
लग्नाची अजब प्रथा
नवी दिल्ली 03 डिसेंबर : आज जग पूर्वीपेक्षा खूप प्रगत झालं आहे. पूर्वी अनेक प्रकारच्या गैरसमजांनी जग मागासलेलं होतं, मात्र कालांतराने लोक शिक्षित होऊ लागले. अशा परिस्थितीत त्यांनी अनेक वाईट प्रथा स्वीकारण्यास नकार दिला. पण आजही असे काही लोक आहेत जे या विचित्र प्रथा पाळतात. त्यांच्या मते या प्रथांमुळेच त्यांची ओळख आहे. त्यासाठी त्यांना रक्ताच्या काहीही करावं लागलं तरी चालेल.
वाईट प्रथांबद्दल बोलायचं झालं तर त्यात बांगलादेशातील एका समुदायाचा उल्लेख नक्कीच होतो. बाप-मुलीचे नातं या समाजात कलंकित आहे. सहसा वडिलांना मिठी मारताच मुलीला सर्वात सुरक्षित वाटतं, मात्र इथल्या मुलींना त्याच बापाची भीती वाटते. यामागील कारणही खूप भीतीदायक आहे. खरं तर बांगलादेशातील या समुदायात मुलगी तरुण होताच तिचे वडील तिचा नवरा बनतात.
advertisement
आम्ही बोलत आहोत बांगलादेशातील मंडी जमातीबद्दल. या जमातीत शतकानुशतके एक विचित्र प्रथा चालत आली आहे. इथे तरुण वयात स्त्री विधवा झाली तर पुरुष तिच्याशी पुनर्विवाह करतो. या लग्नात तो तिला बायकोचे सर्व हक्क देतो. तिला सांभाळतो. पण जर स्त्रीला पहिल्या लग्नापासून मुलगी असेल तर तो ही मुलगी वयात येताच तिच्याशीच लग्न करतो. याच अटीवर तो विधवेशी लग्न करण्यास तयार होतो. म्हणजे ज्या व्यक्तीला मुलगी लहान वयात बाप म्हणून हाक मारते, तिच व्यक्ती तरुण होताच तिचा नवरा बनते.
advertisement
मंडी जमातीतील लोक शतकानुशतके ही वाईट प्रथा पाळत आहे. या प्रथेमुळे ते दोन महिलांना सावरतात, असं ते सांगतात. आधी विधवा आई आणि नंतर तिच्या मुलीला. मात्र या दुष्ट प्रथेने आजवर अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मंडी जमातीतील ओरोला नावाच्या मुलीने या दुष्ट प्रथेचा पर्दाफाश केला होता. तिने सांगितलं, की ती लहान असतानाच तिचे वडील वारले होते. त्यानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केलं. ओरोला त्या व्यक्तीला आपले वडील मानायची. मात्र, ती वयात येताच याच व्यक्तीने तिच्यासोबत लग्न केलं.
मराठी बातम्या/Viral/
इथे मुलगी तरुण होताच वडीलच करतात तिच्यासोबत लग्न, बापासोबतच संसार करते लेक, विचित्र प्रथा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement