नवरीची साडी 17 कोटींची तर मेकअप 30 लाखाचं; देशातील सर्वात चर्चीत आणि महागडं लग्न
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लग्नात करोडोचा खर्च करणारे लोक नेहमीच चर्चेत असतात. या लग्नाबद्दल लोकांना नेहमीच उत्सुकता असते. पण, आज आम्ही तुम्हाला देशातील अशा लग्नाबद्दल सांगणार आहे, ज्यामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च झाला.
मुंबई, 03 डिसेंबर : तुळशीच्या लग्नानंतर आता लग्नांच्या मुहुर्तांची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता देशभरात लग्नाचा माहोल आहे. यंदाच्या हंगामात सुमारे पाच लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाज आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAT) ने दावा केला आहे की डिसेंबरपर्यंत देशात सुमारे 40 लाख लग्न होणार आहेत. यापैकी हजारो लग्नांवर कोट्यवधी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.
लग्नात करोडोचा खर्च करणारे लोक नेहमीच चर्चेत असतात. या लग्नाबद्दल लोकांना नेहमीच उत्सुकता असते. पण, आज आम्ही तुम्हाला देशातील अशा लग्नाबद्दल सांगणार आहे, ज्यामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च झाला. 7 वर्षांपूर्वी झालेले हे लग्न आजही देशातील सर्वात महागडे लग्न मानले जाते.
आम्ही बोलत आहोत ते कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल. रेड्डी हे कल्याण राज्य प्रगती पक्षाचे संस्थापक होते आणि एनबीएफसी कंपनी एनोबल इंडिया सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेडचे संस्थापक देखील आहेत. त्यांची मुलगी ब्राह्मणी हिचं लग्न 6 नोव्हेंबर 2016 रोजी झालं. यामध्ये लग्नाचं सोडाच, पण नवरीला तयार करण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले. या लग्नावर जवळपास 500 कोटी रुपये खर्च झाल्याचे समजते.
advertisement
या लग्नाची देशभर चर्चा झाली कारण त्याचा कार्यक्रम सलग 5 दिवस चालला होता. या लग्नात जवळपास 50 हजार पाहुणे उपस्थित होते. पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी एलसीडी स्क्रीन पाठवण्यात आल्या होत्या. स्क्रीन उघडताच, रेड्डी कुटुंबातील सदस्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ प्ले केला जायचा आणि पाहुण्यांना आमंत्रण मिळायचं.
या लग्नाची शोभा इतकी होती की, बंगळुरू शहरातील 5 आणि 3 स्टार हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी 1500 हून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी 3000 हून अधिक सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले होते. पाहुण्यांना विमानतळ किंवा रेल्वे स्थानकांवरून लग्नाच्या ठिकाणी आणण्यासाठी 15 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते.
advertisement
याशिवाय 2000 खासगी टॅक्सीही तैनात करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमस्थळापासून लग्न मंडपात जाण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. राजेशाही थाटात सजवलेल्या पाहुण्यांसाठी 40 बैलगाड्यांची व्यवस्था होती.
रेड्डी कुटुंब राजेशाहीसारखे दिसत होते
या लग्नात केवळ पाहुण्यांच्या मेजवानीवर पैसे खर्च झाले असे नाही, तर रेड्डी कुटुंबही राजघराण्यासारखे दिसत होते. फक्त वधूबद्दल बोलायचे तर तिने 17 कोटी रुपयांची कांजीवरम साडी नेसली होती. त्यात सोन्याच्या धाग्याचे काम होते, तर लग्नात दान केलेल्या सोन्याचे आणि हिऱ्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे 5 कोटी रुपये होती. वधूला सजवण्यासाठी टॉप 50 मेकअप आर्टिस्टना बोलावण्यात आले होते. यासाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च करण्यात आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 03, 2023 11:51 AM IST
मराठी बातम्या/Viral/
नवरीची साडी 17 कोटींची तर मेकअप 30 लाखाचं; देशातील सर्वात चर्चीत आणि महागडं लग्न