लंडनला भेट देणाऱ्या एका पर्यटकाला पिकाडिली सर्कस स्टेशनच्या भिंतीवर एक विचित्र काळ्या आणि पांढऱ्या चक्रव्यूहासारखं चिन्ह पाहून खूप आश्चर्य वाटलं. सुरुवातीला त्याला वाटलं की ही एक जाहिरात आहे, परंतु जेव्हा त्याला वेगवेगळ्या स्टेशनवर समान चिन्हे दिसली तेव्हा त्याची उत्सुकता आणखी वाढली. त्याने एक फोटो काढला आणि इंटरनेटवर लोकांना विचारलं की ते काय आहे.
advertisement
माशी बसली आणि जिंकले 17 कोटी, खेळाच्या मैदानात चमत्कारच घडला! Watch Video
हे भूलभुलैया स्टेशन तिकीट हॉल, कॉरिडॉर आणि प्लॅटफॉर्म सारख्या सार्वजनिक ठिकाणी बसवण्यात आले आहेत. पर्यटक त्यांना पाहून आकर्षित होतात आणि बरेच लोक त्यांच्या बोटांनी ते सोडवण्याचा प्रयत्न देखील करतात.
What is this?advertisementbyu/Metrobuss inlondon
प्रत्येक 60×60 सेमी प्लेट एका भूलभुलैयासारखी दिसते, ज्यामध्ये मध्यभागीपासून रेड क्रॉसपर्यंतचा मार्ग शोधता येतो. प्रत्येक प्लेटला क्रमांक देखील दिलेले आहेत, जे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ट्यूब चॅलेंज दरम्यान सर्व स्थानकांना कोणत्या क्रमाने भेट देण्यात आली यावर आधारित आहे.
Plane Secret : विमानात स्मोकिंगला बंदी, मग अॅशट्रे का असतो? एअर हॉस्टेसने केला शॉकिंग खुलासा
या चिन्हाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हे काय आहे, याबाबत वेगवेगळी उत्तरं येऊ लागली. कोणीतरी विनोदाने म्हटलं की हा 1896चा क्यूआर कोड आहे, तर कोणी अंदाज लावला की तो स्टेशनचा नकाशा असू शकतो. काहींनी म्हटलं की ते अग्निशामक बाहेर पडण्याचं चिन्ह आहे, तर बरेच लोक स्वतःही गोंधळलेले दिसले. पण नंतर सत्य बाहेर आलं.
या चिन्हाचा अर्थ काय?
खरंतर हे एक सामान्य चिन्ह नाही तर 2013 मध्ये लंडन अंडरग्राउंडच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त बनवलेल्या कलाकृतीचा एक भाग आहे. या कला मालिकेचं नाव लॅबिरिंथ आहे, जे ब्रिटिश कलाकार मार्क वॉलिंगर यांनी डिझाइन केलं होतं. या आर्ट प्रकल्पांतर्गत त्या वेळी लंडन अंडरग्राउंडच्या सर्व 270 स्थानकांवर वेगवेगळ्या भूलभुलैयासारख्या डिझाइन असलेल्या प्लेट्स बसवण्यात आल्या होत्या. हे आर्ट आता एकूण 272 स्थानकांवर आहे.