माशी बसली आणि जिंकले 17 कोटी, खेळाच्या मैदानात चमत्कारच घडला! Watch Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Fly win golf match video : खेळात मेहनत, परफेक्शनसोबत नशीबाची साथही तितकीच महत्त्वाची असते, याच उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. ज्यात मॅचमध्ये हरणार असं वाटत असतानाच एका माशीने शेवटचा निकाल बदलला आहे.
नवी दिल्ली : गेम, खेळ किंवा स्पर्धा जोपर्यंत स्पष्ट निकाल दिसत नाही तोपर्यंत कोण जिंकणार कोण हरणार सांगू शकत नाही. बऱ्याचदा एखादा हरणार असं वाटतं पण शेवटच्या क्षणी बाजी अशी पलटते की जिंकणारा हरतो आणि हरणारा जिंकतो. खेळात मेहनत, परफेक्शनसोबत नशीबाची साथही तितकीच महत्त्वाची असते, याच उत्तम उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ. ज्यात मॅचमध्ये हरणार असं वाटत असतानाच एका माशीने शेवटचा निकाल बदलला आहे. एका खेळाडूला एका माशीने स्पर्धा जिंकवून दिली आहे.
अमेरिकेतील मेरीलँड येथील बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप. केव्हज व्हॅली गोल्फ क्लबमध्ये स्पर्धा सुरू होती. ही स्पर्धा फक्त एका शॉटमुळे ऐतिहासिक ठरली. अंतिम फेरीत ब्रिटिश गोल्फर टॉमी फ्लीटवुडने सात अंडरने सुरुवात केली आणि पार 4 सेकंदाच्या होलवर बर्डी केली. त्याचा शॉट जोरदार होता, पण बॉल होलच्या अगदी जवळ थांबला. टॉमीला वाटलं की आता तो सामना हरला, पण नंतर एक चमत्कार घडला.
advertisement
होलजवळ अडकलेल्या बॉलजवळ एक माशी उडत आली आणि ती त्या बॉलवर बसली. माशी जशी त्या बॉलवर सरकू लागली तसा बॉल हलला आणि तो थेट होलमध्ये जाऊन पडला. पीडीएच्या 10 सेकंदांच्या नियमानुसार टॉमीला विजेता घोषित करण्यात आलं.
advertisement
त्यावेळी माशी दिसली नव्हती. पण जेव्हा कॅमेरा फुटेज बारकाईने रिप्ले केलं गेलं तेव्हा माशी बॉलवर बसलेली दिसली. त्याचा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
माशीमुळे गोल्फरने केवळ बीएमडब्ल्यू चॅम्पियनशिप जिंकली नाही तर 20 लाख डॉलर्स सुमारे 17 कोटी रुपयांचं बक्षीसदेखील जिंकलं. किमान सोशल मीडियावर तरी गोल्फर टॉमी फ्लीटवुडच्या विजयाचं श्रेय या माशीला दिलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
September 04, 2025 1:25 PM IST