TRENDING:

ब्रह्मांडात सापडले 2 सूर्य, 3 नवीन पृथ्वी? NASA च्या रिसर्चमधून समोर आलं धक्कादायक 'जग'

Last Updated:

सकाळचा सूर्य मावळल्यानंतर दुसरा त्याच्या मागून उगवणं हे ऐकायला अगदी एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटासारखं वाटतं ना? पण ही कल्पना आता फक्त कल्पना राहिलेली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पृथ्वीवर संध्याकाळ झाली की सूर्य मावळतो आणि हळूहळू अंधारपडू लागतो आणि रात्री तर लख्ख काळोख होतो. कधीकधी सूर्याला पाहून असं वाटतं की सूर्य मावळलाच नाही तर? आणि सुर्य मावळत असेल तर त्याच्या मागून दुसरा सुर्य उगवला तर? सकाळचा सूर्य मावळल्यानंतर दुसरा त्याच्या मागून उगवणं हे ऐकायला अगदी एखाद्या सायन्स-फिक्शन चित्रपटासारखं वाटतं ना? पण ही कल्पना आता फक्त कल्पना राहिलेली नाही.
AI Generated Photo
AI Generated Photo
advertisement

NASA च्या नवीन संशोधनाने हे वास्तवात आणलं आहे. त्यांच्या TESS (Transiting Exoplanet Survey Satellite) या सर्वेक्षण उपग्रहाने पृथ्वीपासून सुमारे 190 प्रकाशवर्ष दूर असलेल्या TOI-2267 नावाच्या बायनरी स्टार सिस्टिममध्ये तीन नवीन ग्रह शोधले आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे ग्रह आकारमानाने आणि रचनेने अगदी पृथ्वीसारखे आहेत.

या सिस्टिमची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथं दोन सूर्य आहेत. म्हणजेच इथं डबल सनसेट पाहणं ही रोजचीच गोष्ट असेल. हे ऐकूनही विश्वास बसणार नाही, पण हा तोच प्रकार आहे जो आपण ‘स्टार वॉर्स’ सिनेमात पाहिला होता, जेव्हा ल्यूक स्कायवॉकर दोन सूर्यांकडे पाहतो.

advertisement

TOI-2267 हे एक कॉम्पॅक्ट बायनरी सिस्टिम आहे म्हणजे दोन तारे एकमेकांच्या खूप जवळ आहेत आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षण शक्ती सतत एकमेकांवर परिणाम करतात. आतापर्यंत वैज्ञानिकांचं मत असं होतं की अशा वातावरणात ग्रह निर्माण होणं जवळजवळ अशक्य असतं, कारण दोन्ही तार्‍यांचं गुरुत्वाकर्षण कोणत्याही स्थिर रचनेला टिकू देत नाही. पण या सिस्टिमने ही समजूत पूर्णपणे चुकीची ठरवली. इथे फक्त एक नव्हे तर तीन स्थिर आणि रॉकी ग्रह सापडले, जे दाखवतात की विश्वातील शक्यतांना कोणतीच मर्यादा नाही.

advertisement

दोन तार्‍यांभोवती फिरणारे तीन ग्रह

NASA च्या निरीक्षणानुसार, या तीन ग्रहांपैकी दोन एकाच ताऱ्याभोवती फिरतात, तर तिसरा ग्रह त्याच्या साथी ताऱ्याभोवती फिरतो.

ही पहिलीच वेळ आहे की एका बायनरी सिस्टिममधील दोन्ही तार्‍यांजवळ ट्रान्झिटिंग प्लॅनेट्स सापडले आहेत. ही शोध जुन्या ग्रह निर्मितीच्या थिअरीजला मोठं आव्हान देणारी आहे.

हा शोध कसा लागला?

advertisement

सर्वप्रथम TESS सॅटेलाइटने या ग्रहांचे संकेत पकडले. नंतर SHERLOCK नावाच्या सॉफ्टवेअरने त्याचा डेटा विश्लेषित केला. पुढे SPECULOOS आणि TRAPPIST या टेलिस्कोप नेटवर्क्सनी या ग्रहांची पुष्टी केली. शास्त्रज्ञांच्या मते, हा आतापर्यंतचा सर्वात थंड आणि सर्वात कॉम्पॅक्ट स्टार-पेअर आहे ज्याभोवती ग्रह सापडले आहेत, म्हणजे ही शोध अनेक अर्थांनी ऐतिहासिक आहे.

पुढे काय?

advertisement

आता वैज्ञानिक या सिस्टिमचा सखोल अभ्यास James Webb Space Telescope च्या माध्यमातून करतील. यातून या ग्रहांचा मास, घनता आणि वातावरण याबद्दल माहिती मिळू शकते. जर दोन सूर्यांच्या इतक्या जटिल वातावरणातही हे ग्रह स्थिर राहू शकतात, तर याचा अर्थ असा की जीवनासाठी योग्य ग्रह विश्वात आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूपच जास्त आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

TOI-2267 ही केवळ तीन ग्रहांची गोष्ट नाही, तर आपल्या विचारांच्या मर्यादा ओलांडणारी कहाणी आहे. जिथं दोन सूर्य मावळतात, तिथं कदाचित एक नवी पृथ्वी उगवू शकते आणि हीच NASAच्या या शोधाची खरी सुंदरता आहे.

मराठी बातम्या/Viral/
ब्रह्मांडात सापडले 2 सूर्य, 3 नवीन पृथ्वी? NASA च्या रिसर्चमधून समोर आलं धक्कादायक 'जग'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल