नेपाळमध्ये अनेक स्थानिक ब्रँड लोकप्रिय आहेत, त्यात Mustang Whisky आणि Khukri Rum या दोन नावांचा वरचा क्रमांक लागतो.
Mustang Whisky ची एक बाटली सुमारे 1160 नेपाळी रुपये म्हणजे अंदाजे 750 भारतीय रुपये इतकी मिळते.
तर Khukri Rum ची किंमत 2079 नेपाळी रुपये म्हणजे जवळपास 1300 भारतीय रुपये इतकी असते. बिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेपाळमध्ये स्थानिक बिअर 160 ते 250 नेपाळी रुपयांदरम्यान, म्हणजेच सुमारे 100 ते 150 भारतीय रुपये इतकी मिळते.
advertisement
भारत आणि नेपाळच्या बिअरमध्ये फरक काय?
भारतामध्येही बिअरचे दर राज्यनिहाय बदलतात. उदाहरणार्थ, गोवामध्ये बिअर सर्वाधिक स्वस्त मिळते, तर दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये किंमत थोडी जास्त असते. भारत आणि नेपाळ दोन्ही ठिकाणी सरकार दारू आणि बिअरवर मोठा कर लावते, कारण तो सरकारी महसुलाचा एक महत्त्वाचा स्रोत असतो. नेपाळमध्ये तर सरकार या उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यावर कर लावण्याची नीती पाळते.
भारतामध्ये कुठे मिळते सर्वात स्वस्त दारू?
भारतातील दारूच्या किंमती प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या आहेत. गोवा हे भारतातील सर्वात स्वस्त दारू मिळणारं राज्य मानलं जातं. याचं कारण म्हणजे गोव्यातील एक्साइज ड्युटी खूप कमी आहे. पर्यटन वाढवण्यासाठी सरकारने दारूवरील कर कमी ठेवले आहेत.
म्हणूनच गोव्यात मिळणारी बिअर किंवा व्हिस्की दिल्ली, मुंबई किंवा लखनऊपेक्षा 200 ते 300 रुपयांनी स्वस्त असते. तर दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात दारू तुलनेने महाग मिळते, कारण या राज्यांत कराचा दर जास्त आहे.
दोन्ही देशांमध्ये दारूचे सेवन आणि उत्पादन वेगळ्या स्वरूपात चालतं, पण गोष्ट स्पष्ट आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रदेशात दारू तुलनेने स्वस्त मिळते. त्यामुळे नेपाळमध्ये स्थानिक बिअर स्वस्त असली तरी भारतातील गोवा अजूनही “स्वस्त दारूचं हॉटस्पॉट” म्हणून ओळखलं जातं.
