ऑस्ट्रेलियातील 63 वर्षीय Tracey Skeates यांची ओळख अमेरिकेत राहणाऱ्या 'Charlotte' सोबत इन्स्टाग्रामवर झाली. ऑक्टोबर 2023 मध्ये दोघांची मैत्री झाली. एका आठवड्यात Tracey यांनी Charlotte ला फोन दुरुस्तीसाठी 500 ऑस्ट्रेलियन डॉलर्स पाठवले.
चार्लटने Tracey यांना सांगितले की, तिला ऑस्ट्रेलियाला यायचं आहे आणि Tracy सोबत लग्न करायचं आहे. ही गोष्ट ऐकून Tracey खूप आनंदी झाले. पण चार्लटने त्यांच्याकडून महिना 4000ऑस्ट्रेलियन डॉलर्स (भारतात 2 लाख रुपये) पाठवले.
advertisement
Tracey यांनी आतापर्यंत 22 लाख रुपये चार्लटला पाठवले आणि त्यासाठी आपली कार आणि महागडी गिटार विकली. चार्लटने अनेकवेळा विमानतळावर जाण्यापूर्वी अपघात, कोमा किंवा पोलीस केसची कारणे सांगून ऑस्ट्रेलियाला येण्याचं टाळलं. मात्र Tracey यांना हे समजलं नाही.
शेवटी, Tracey यांनी ‘रिव्हर्स इमेज सर्च’ केल्यानंतर समजलं की, चार्लटच्या फोटोमधील महिला म्हणजे Yisela Avendano नावाची कोलंबियन बिकिनी मॉडेल आहे. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
फसवणूक समजूनही Tracey पैशांची मदत पाठवत राहिले. यामुळे ते आर्थिक अडचणीत आले. त्यांची मुलगी Tamika यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. पैसे संपल्यावर Tracey यांना तंबूत राहावं लागत आहे आणि त्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांना इतरांकडे देण्याचा विचार केला आहे.
हे ही वाचा : Really आणि Actually मध्ये फरक काय? कोणता शब्द कधी वापरायचा?
हे ही वाचा : Apple ने iPhone साठी लाँच केलं iOS 18.2 सॉफ्टवेअर, हे आहेत भन्नाट फीचर्स!