अनेकदा या डिलिव्हरी कंपन्या इतर कंपन्यांच्या वस्तूंचा प्रचार करतात आणि ग्राहकांना एका वस्तूवर दुसरी वस्तू मोफत देतात. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं, ज्याने स्विगी इन्स्टामार्टवरून अंडी ऑर्डर केली होती. जेव्हा त्याने पॅकेट उघडून पाहिलं, तेव्हा तो थक्क झाला, कारण आतमध्ये मुलींच्या खासगी वस्तू होत्या, ज्याचा त्याला उपयोग होऊ शकत नव्हता!
advertisement
तरुणाला मिळालं पीरियड पँटीजचे पॅकेट
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर r/indiasocial नावाचं एक चर्चा मंच आहे. नुकतंच एका व्यक्तीने या मंचावर एक फोटो पोस्ट केला, ज्यामागील कहाणी खूपच रंजक आहे. त्या तरुणाने सांगितलं की, त्याने स्विगी इन्स्टामार्टवरून स्वतःसाठी अंडी ऑर्डर केली होती. स्विगीच्या इन्स्टामार्ट सेवेचा वापर दररोज लाखो लोक करत असतील, ज्या अंतर्गत घरबसल्या लोकांना रोजच्या गरजेच्या वस्तू काही मिनिटांत मिळतात. पण यावेळी डिलिव्हरी करणाऱ्यांकडून एक निष्पाप चूक झाली. खरं तर, कंपनी आपल्या प्रत्येक ऑर्डरसोबत ग्राहकांना एक उत्पादन मोफत देत होती. तेच उत्पादन अंड्यांसोबत त्या व्यक्तीलाही मिळालं. ते महिलांना मासिक पाळीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या पीरियड पँटीजचे पॅकेट होतं.
ही पोस्ट झाली व्हायरल...
यामध्ये लाज वाटण्यासारखं काही नाही, पण विचित्र गोष्ट अशी आहे की, हे उत्पादन एका तरुणाला देण्यात आलं, ज्याला कदाचित त्याची गरज नव्हती आणि कदाचित त्याच्या घरातही अशी कोणतीही महिला नव्हती जी ते वापरू शकेल. त्या तरुणाने फोटो शेअर करत गंमतीने लिहिलं, "इन्स्टामार्टवरून अंडी ऑर्डर केली होती, हे मोफत मिळालं... मी तर मुलगा आहे!" ही पोस्ट व्हायरल झाली आहे; तिला 11 हजारांपेक्षा जास्त लाईक्स किंवा अपव्होट्स मिळाले आहेत. अनेक लोकांनी त्या व्यक्तीसोबत मस्करी केली आणि मजेदार कमेंट्स केल्या. एकाने गंमतीने विचारलं, "मग तुम्ही त्याचा वापर करणार का?"
हे ही वाचा : या प्राण्याच्या दुधात असते दारू! पिताच येते जबरदस्त नशा; प्राण्याचं नाव ऐकून व्हाल थक्क!
हे ही वाचा : 20 रुपयांच्या नोटेवरील 'ते' सुंदर ठिकाण खरंच आहे का? इन्स्टाग्राम युजर्सने दाखवलं सत्य, पहा VIDEO