दूध उकळण्यात काय इतकं रॉकेट सायन्स आहे, पाकिस्तानात असं कोणत्या पद्धतीने दूध उकळलं जातं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. माया खान असं या महिलेचं नाव आहे. ही पाकिस्तानी महिला ज्यात ती दुधाचं पॅकेट उघडून ते उकळताना दिसते.
ओ तेरी! विमानाने टेक ऑफ केलं आणि 2026 मधून 2025 सालात लँड झालं, कसं काय?
advertisement
व्हिडिओमध्ये तिने तक्रार केली आहे की, "पाकिस्तानात मला फक्त एकच गोष्ट आवडत नाही, दूध उकळणं. रात्री 1 वाजता घरी येऊन दूध उकळणं खूप कठीण आहे. दूध उकळणं, त्यावर मलाई काढणं, ते थंड करणं आणि बाटलीत ठेवणं हे थकवणारं आहे." माया गमतीने म्हणाली, "काश माझ्याकडे अल्डी किंवा वॉलमार्टसारखं गॅलन दुधाचं मशीन असतं."
व्हिडीओवरून महिला कच्च्या दुधाबाबत सांगत असल्याचं समजतं. माहितीनुसार पाकिस्तानमध्ये 95% दूध कच्चं सेवन केलं जातं. भारतातही होतं. पण ते पिण्यापूर्वी ते उकळणे ही सामान्य पद्धत आहे. उकळल्याने ई. कोलाय आणि साल्मोनेलासारखे धोकादायक बॅक्टेरिया मारले जातात, ज्यामुळे दूध पिण्यायोग्य बनतं.
मायाच्या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. "तक्रार करण्याऐवजी बाजारात जाऊन तिथंही पाश्चराइज्ड दूध उपलब्ध आहे", "ही पाकिस्तानची समस्या नाही, ती तुमची समस्या आहे." अशी कमेंट युझर्सनी तिच्या व्हिडीओवर केली आहे.
अनेकांनी मायाला बाजारातून पाश्चराइज्ड दूध खरेदी करण्याचा सल्ला दिला, जे आता भारत आणि पाकिस्तान दोन्ही ठिकाणी सहज उपलब्ध आहे.
