रशियातील हे प्रकरण आहे. 15 वर्षांचा हा रुग्ण ज्याचं नाव मॅक्सिम. त्याला किडनीची गंभीर समस्या निर्माण झाली. त्याच्या किडनीमध्ये उलटा मूत्र प्रवाह येत होता, ज्यामुळे शरीरातील कचरा बाहेर पडू शकत नव्हता. मॉस्कोच्या प्रतिष्ठित युरोपियन मेडिकल सेंटरमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन केलं. त्यांनी मॅक्सिमची मूत्रवाहिनी त्याच्या मूत्राशयाशी पुन्हा जोडली आणि एका महिन्यानंतर ड्रेनेज ट्यूब काढून टाकली.
advertisement
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांत मॅक्सिमला त्या बाजूला तीव्र वेदना जाणवल्या, त्याचा रक्तदाब अचानक वाढला. त्याच्या किडनी सुजल्या होत्या, कारण युरिन निघत नव्हती. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतरचा हा सामान्य परिणाम असल्याचं सांगितलं आणि कोणताही विशिष्ट उपचार न देता त्याला घरी पाठवलं.
पण मॅक्सिमच्या वेदना दिवसेंदिवस वाढतच गेल्या. अनेक महिने त्याने असह्य वेदना सहन केल्या. मग एके दिवशी वेदना इतक्या तीव्र झाल्या की त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं. तपासणी करता जे सत्य समोर आलं त्यामुळे सगळेच हादरले.
मॅक्सिमसोबत काय घडलं होतं?
तपासणीत असं दिसून आलं की त्याची मूत्रवाहिनी पूर्णपणे बंद झाली आहे, ज्यामुळे त्याचं मूत्रपिंड कार्य करू शकत नव्हतं. डॉक्टरांनी त्याच्या पाठीला छिद्र पाडलं आणि मूत्र काढून टाकण्यासाठी एक नळी घातली. पण समस्या तिथेच संपल्या नाहीत. मार्चमध्ये जेव्हा त्याला दुसऱ्या क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा एक्स-रेमध्ये एक धक्कादायक सत्य समजलं.
शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या शरीरात दोन ट्युब राहिल्याचं समोर आलं. ज्यामुळे मॅक्सिमच्या शरीरात गुंतागुंत निर्माण झाली होती. त्याच्या किडनीवर प्रचंड दबाव आला होता. त्याच्यावर ताबडतोब दुसरी शस्त्रक्रिया केली आणि ट्युब यशस्वीरित्या काढून टाकल्या.
आईची भरपाईची मागणी
मॅक्सिमच्या किडनी शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या भयानक निष्काळजीपणामुळे त्याचा जीव धोक्यात आलाच, पण त्याच्या कुटुंबाला आर्थिक आणि भावनिकदृष्ट्याही मोठा धक्का बसला. मॅक्सिमला आता आयुष्यभर ब्लड प्रेशरची औषधं घ्यावी लागत आहेत, तो शाळेत जाऊ शकत नाही आणि भविष्यात त्याला किडनी ट्रान्सप्लांटचा धोका आहे.
एक लोकप्रिय नेता; पण त्याने आयुष्यात कधीच दात घासले नाही, टॉयलेटमध्ये गेला नाही, अंघोळीचाही कंटाळा
मॅक्सिमच्या आईने या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. तिच्या वकिलासोबत मिळून तिने युरोपियन मेडिकल सेंटरविरुद्ध दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. रुग्णालयाकडून 100 दशलक्ष रूबल म्हणजे अंदाजे 10.63 कोटी रुपये भरपाईची मागणी केली आहे. भरपाईच्या मागणीत तिने उपचारांवर आधीच खर्च झालेल्या 3 दशलक्ष रूबल म्हणजे अंदाजे 3.18 दशलक्ष रुपयांचा उल्लेख केला.
मॅक्सिमची आई म्हणाली, "माझ्या मुलाला सामान्य जीवन जगण्याची आवश्यकता आहे. रुग्णालयाच्या चुकीमुळे तो अपंग झाला आहे. त्याच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी आम्ही 100 दशलक्ष रुबल मागत आहोत.
पण रुग्णालय हे आरोप फेटाळत आहे. क्लिनिकने कोणतीही चूक झाली नाही असं म्हटले आहे आणि उपचाराच्या थकबाकीच्या रकमेसाठी आईविरुद्ध 3.18 लाख रुपयांचा प्रतिवाद दाखल केला आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केलं आहे की, ज्यात म्हटलं आहे "आमच्या टीमने त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न केले. हे दुर्दैवी आहे, पण आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन करू."