विमानातून व्हिडीओ काढताना व्यक्तीकडून अचानक मोबाईल खाली पडला. त्यानंतर मोबाईलमद्ये जे दृश्य रेकॉर्ड झालं ते चकित करणारं होतं. रेकॉर्ड झालेला व्हिडीओ सध्या समोर आलाय. हा व्हिडीओ प्रचंड वेगानं इंटरनेटवर व्हायरल होतोय.
विमानातून पडलेल्या मोबाईलमध्ये जे दृश्य रेकॉर्ड झालं याचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मोबाईल खूप वेगानं खाली पडत होता. त्यामुळे कोणतंही दृश्य स्थिर दिसलं नाही. याशिवाय वाऱ्याचा आवाजही खूप मोठ्यानं येतोय. शेवटी मोबाईल जमिनीवर येऊन आदळल्यावर एक डुक्कर मोबाईलजवळ आला. तो कॅमेऱ्याला खाण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
advertisement
Nextdoor नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वच चकित झालेत. अनेकांनी कमेंट करत प्रश्नही विचारले. एवढ्या उंचावरुन मोबाईल खाली पडल्यावर मोबाईलचं काय झालं?
दरम्यान, सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. दररोज काहीतरी वेगळं पहायला मिळतं. अनेक निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ लोकांचं लक्ष वेधून घेत असतात.
