पितृपक्षाच्या कालाधीतील ब्युटी पार्लरच्या आतील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता कॅमेरा एका गल्लीतून तिथल्या ब्युटीपार्लरमध्ये जातो. तिथं आत चार महिला बसलेल्या दिसतील. पितृपक्ष, रिकामी ब्युटी पार्लर आणि या महिला आत जे काही करताना दिसल्या ते पाहून तुम्ही शॉक व्हाल.
Shocking! अंगावर पडली बायको आणि नवऱ्याचा मृत्यू, कारणही धक्कादायक
advertisement
तुम्ही पाहाल तर या महिला गोलाकार बसल्या आहेत. सगळ्या अगदी निवांत आहेत आणि त्यांच्या हातात तुम्हाला पत्ते दिसतील. चौघीही पत्ते खेळत बसल्या आहेत. त्या स्थानिक जुगारांसारख्याच शैलीत बोलत असल्याचं दिसून येतं आणि व्हिडिओ इथंच संपतो.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @anchal_gopal_dhiman_19 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. दहा दिवसांत त्याला 48 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "श्राद्धादरम्यान ब्युटी पार्लरची अवस्था". कॅप्शनमध्ये विचारले आहे, "तुम्हीही असेच करता का?"
बापरे! जिवंत झिंगा खायला गेली पण झिंग्यानेच तिला 'खाल्लं', Shocking Video
कमेंट सेक्शनमध्ये, बहुतेक लोकांनी या मजेशीर व्हिडिओवर हसणाऱ्या इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आहेत, तो विनोद म्हणून घेतला आहे. एका युझरने, "काळजी करू नका, नवरात्री येत आहे. दररोज गरबा गर्ल्स पूर्ण मेकअप करण्यासाठी येतील." पण काहींनी त्यावर आक्षेपही घेतला आहे. एका युझरने कमेंटमध्ये "पितृपक्षाची म्हणजेच श्रद्धाची खिल्ली उडवू नका. जुगार, पत्ते खेळण्याऐवजी काहीही करा. तुमच्या पूर्वजांचं ध्यान करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा. तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण करा. तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळेल.", अशी कमेंट केली आहे.