बापरे! जिवंत झिंगा खायला गेली पण झिंग्यानेच तिला 'खाल्लं', Shocking Video
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shrimp attack on woman : वेदनेने महिला मोठ्याने ओरडताना दिसते. रेस्टॉरंटचा एक कर्मचारी तिच्या मदतीला धावून येतो. तो तिच्याह हातावरील झिंगा काढण्याचा बराच वेळ प्रयत्न करतो. पण...
नवी दिल्ली : चिकन, मटण, मासे असे मांसाहारी पदार्थ आपण नीट शिजवून खातो. पण असे काही देश आहेत जिथं प्राणी जिवंत खाल्ले जातात. तुम्ही सोशल मीडियावर असे व्हिडीओ पाहिले असतील जिथं लोक जिवंत मासे खातात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला जिवंत झिंगा खात होती. जे तिला चांगलंच महागात पडलं.
जिवंत झिंगा खाणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिला एका रेस्टॉरंटमध्ये आहे. तिच्यासमोर बरेच पदार्थ आहेत. एका भांड्यात खेकडाही दिसत आहे. एका प्लेटमध्ये मोठा झिंगा आहे, जो जिवंत आहे.
advertisement
त्याला ती हातात घेते आणि खेकडा असलेल्या रश्यात सोडायला जाते. पण झिंगा रश्यात पडतच नाही. तो भांड्याबाहेर पडतो. महिला स्टिकने त्याला उचलायला जाते. जशी ती त्याला स्टिकमध्ये पकडते आणि ग्रेव्हीमध्ये टाकायला जातो तोच तो झिंगा उडतो आणि त्या महिलेच्या हातावर पडतो. तसा तो तिच्या हाताला करकचून चावतो.
वेदनेने महिला मोठ्याने ओरडताना दिसते. रेस्टॉरंटचा एक कर्मचारी तिच्या मदतीला धावून येतो. तो तिच्याह हातावरील झिंगा काढण्याचा बराच वेळ प्रयत्न करतो. पण झिंगा महिलेच्या हातावर इतका घट्ट बसतो की त्या कर्मचाऱ्याच्या मदतीनेही तो सुटता सुटत नाही. कसंबसं करून तो महिलेच्या हातावरील झिंगा हटवतो.
advertisement
Girl tries to cook a mantis shrimp and finds out pic.twitter.com/eLzdHj2KwP
— non aesthetic things (@PicturesFoIder) August 13, 2024
@PicturesFoIder एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जिवंत झिंगा खाणाऱ्या महिलेला सगळ्यांनी ट्रोल केलं आहे.
Location :
Delhi
First Published :
September 14, 2025 4:17 PM IST