विमानाने टेकऑफ करून फक्त 15 मिनिटं उलटली होती आणि विमान उंचीवर येऊ लागलं होतं. पण त्यानंतर विमानाला तीव्र धक्का बसला. दहा सेकंदांनंतर विमानाला दुसरा धक्का बसला, तो पाण्याबाहेर मासा तडफडावा तसा हवेत तडफडत होता. एअर ट्रॅफिक कंट्रोल रूममधील ग्राउंड स्टाफ आणि विमानतळ कर्मचाऱ्यांच्याही चेहऱ्याचा रंग उडाला.
काही सेकंदांनंतर आकाशात एक मोठा स्फोट झाला. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या विमानाचे दोन तुकडे झाले ते जमिनीकडे वेगाने आले. आधीम एका घरावर आदळले, नंतर पार्कच्या तिकीट बूथवर आदळले आणि थेट नानहाई पार्कच्या बर्फाळ तलावात कोसळले. जळत्या अवशेषांनी जवळच उभ्या असलेल्या नौका देखील व्यापल्या.
advertisement
विमानातील सगळ्या प्रवाशांचा मृत्यू
विमान कोसळल्यानंतर काही वेळातच बचाव पथकं अपघातस्थळी पोहोचली. या बचाव पथकात 100 हून अधिक अग्निशमन दल, 250 पोलीस अधिकारी, 50 पार्क कर्मचारी आणि 20 पाणबुड्यांचा समावेश होता. बचाव पथकाने बर्फ फोडून मलबा काढण्यास सुरुवात केली. रात्रीपर्यंत 36 मृतदेह बाहेर काढण्यात आले. अहवालात असं दिसून आलं आहे की अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमानाचे तुकडे तुकडे झाले. विमानातील अनेक प्रवाशांचे फक्त अवशेष किंवा शरीराचे अवयव सापडले.
अपघातग्रस्त विमानात 46 चिनी नागरिक आणि एक इंडोनेशियन प्रवासी होते. या अपघातात फ्लाइट कॅप्टन वांग पिन (वय 33 वर्षे), को- पायलट यांग गुआंग (वय 37 वर्षे), फर्स्ट ऑफिसर यी चिनवेई (वय 27 वर्षे), दोन फ्लाइट अटेंडंट आणि एक सुरक्षा अधिकारी यांच्यासह सर्व 46 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला.
अपघाताचं कारण काय?
दुसऱ्या दिवशी जवळजवळ संपूर्ण विमान तलावातून बाहेर काढण्यात आलं. 24 नोव्हेंबर रोजी विमानतळ कर्मचाऱ्यांनी बर्फाळ ढिगाऱ्यातून ब्लॅक बॉक्स शोधून काढला. चीन नागरी विमान प्रशासन (सीएएसी) ने केलेल्या तपासणीत स्फोट, दहशतवादी हल्ला किंवा तांत्रिक बिघाड असं सुचवणाऱ्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला. पण सत्य या सर्व अफवा आणि भीतींपेक्षा खूप मोठं होतं.
चीनच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाने केलेल्या तपासणीत असं दिसून आलं की अपघाताच्या वेळी तापमान गोठणबिंदूपेक्षा कमी होतं, ज्यामुळे विमानाच्या पंखांवर मोठ्या प्रमाणात बर्फ जमा झाला होता. उड्डाण करण्यापूर्वी बर्फ काढला गेला नाही आणि बर्फ काढून टाकण्याची प्रक्रियाही करण्यात आली नाही. उड्डाणानंतर बर्फामुळे विमानाची उंची कमी झाली आणि ते हवेत राहू शकलं नाही. परिणामी विमान अवघ्या दहा सेकंदात जमिनीवर कोसळलं. 2006 मध्ये पूर्ण झालेल्या चौकशीनंतर चायना ईस्टर्न एअरलाइन्सचे 12 कर्मचारी दोषी आढळून आले, त्यांना शिक्षा देण्यात आली.
