अयोध्या : 15 ऑगस्ट 2024 रोजी देशाचा 78वा स्वातंत्र्य दिवस धुमधडाक्यात साजरा झाला. शाळांपासून मंदिरांपर्यंत सर्वत्र तिरंगा फडकवून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या क्रांतीकारकांना मानवंदना देण्यात आली. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अशात एक असा प्रकार समोर आला ज्यानं सर्वजण आश्चर्यचकीत झाले.
रामजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत पोलिसांच्या खुर्चीवर चक्क एक वानर येऊन बसला, तेही स्वातंत्र्यदिनी. वानराला साक्षात मारुतीरायाचं रूप मानलं जातं. अशात एसएचओ (Station House Officer) देवेंद्र कुमार यांच्या खुर्चीवर वानर बसल्यानं सर्वजण आनंदी झाले. देवेंद्र पांडे यांनी वानराला सलामी ठोकली. हे प्रकरण केवळ अयोध्येतच नाही, तर संपूर्ण देशभरात चर्चेत आहे.
advertisement
देवेंद्र पांडे यांनी सांगितलं की, ते जेव्हा ध्वजारोहण करून आपल्या खुर्चीकडे आले, तेव्हा त्यांना खुर्चीत कोणीतरी बसलेलं दिसलं. जवळ येऊन पाहताच वानराचं दर्शन झालं.
धार्मिक मान्यतांनुसार, वानरांना पवनपुत्र हनुमानाचं रूप मानलं जातं. अयोध्येत त्यांची मनोभावे पूजा केली जाते. देवेंद्र पांडेसुद्धा मारुतीरायाचे भक्त आहेत. त्यांनी आपल्या खुर्चीत वानराला पाहताच हात जोडले आणि त्याला सलामी दिली. हा मारुतीरायाचा आशीर्वाद आहे, असं ते म्हणाले.