बाजारात वेगवेगळ्या फ्लेव्हरचे चिप्स मिळतात. चवीला ते खूपच टेस्टी असतात. एकदा हे चिप्स खाल्ले की ते पुन्हा पुन्हा खावत राहावे असे वाटतात. पण या चिप्समध्ये काय काय असू शकतं, याचा तुम्ही कधी विचार केला होता का? मायक्रोस्कोपने या चिप्सचं भयंकर सत्य समोर आणलं आहे. एका व्यक्तीने चिप्सची मायक्रोस्कोपखाली टेस्ट केली. जे दिसलं ते पाहूनच तुम्हीही हादराल.
advertisement
व्हिडीओत पाहू शकता व्यक्ती स्वतः चिप्स खाते आहे. त्याच पाकिटातील एक चिप्स ती काढते आणि मायक्रोस्कोपखाली धरते. चिप्समध्ये काहीतरी विचित्र दिसतं. चमकल्यासारखं काही तरी वाटतं. हे दुसरं तिसरं काही नाही तर प्लॅस्टिक असल्याचं सांगितलं जातं आहे.
व्हिडीओत तरी चिप्समध्ये प्लॅस्टिक असल्याचं दिसतं आहे. पण हे सर्वच चिप्समध्ये असते असं आम्हील सांगत नाही. न्यूज18मराठीही या दाव्याची हमी देत नाही. पण हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून आपणच सावध व्हायला हवं.
हा व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
