रावणाची लंका खरंच सोन्याची होती का? याबाबत न्यूज18ने इतिहास तज्ज्ञांकडून जाणून घेतलं. इतिहासकार निलेश ओक यांनी रामायणाबाबत संशोधनातून उलगडलेली अनेक तथ्यं सांगितली आहेत. यात रावणाच्या सोन्याच्या लंकेचाही समावेश आहे.
Ramayan : रावणाचा वध करण्यासाठी प्रभू रामाला दिव्यास्त्र कसं मिळालं होतं, कुणी दिलं होतं?
इतिहासकार निलेश ओक यांनी सांगितलं, जसं जोधपूरला ब्लू सिटी, जयपूरला पिंक सिटी म्हणतात. तशी सोनेरी लंका, सोन्याची लंका.. सोन्याची लंका म्हणजे सोन्याचे पत्रे वगैरे लावले होते का तर ते शक्य नाही, कदाचित सोन्याचा मुलामा देत असतील. सोनेरी रंग असेल.
advertisement
त्या भागाचं संशोधन करून अभ्यास केला असता एक दगड होता तो लाल आणि सोनेरी रंग यांच्या मधला रंग होता. अशा पद्धतीने त्या भिंती रंगवलेल्या होत्या, असं ओक यांनी सांगितलं.
काय आहे लंकेचा इतिहास?
रावणाच्या सुवर्णनगरीचा लंकेचा इतिहास अत्यंत मनोरंजक आहे. त्याचं सौंदर्य आणि विशालता अद्वितीय आणि अतुलनीय होती. पण तुम्हाला माहित आहे का की रावण लंकेचा पहिला राजा नव्हता आणि त्याने तो बांधलाही नव्हता.
लंकेच्या बांधकामाची कहाणी भगवान शिव आणि देवी पार्वतीशी जोडलेली आहे. पौराणिक ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की भगवान शिव यांनी विश्वकर्माला देवी पार्वतीसाठी सुवर्णनगरी लंका बांधण्यास सांगितलं आणि सप्तर्षी विश्रवा यांना लंकेत गृहप्रवेश आणि पूजा करण्यास सांगितलं. पण विश्रवा ऋषींनी भगवान शिव आणि पार्वती यांच्याकडून दक्षिणा म्हणून लंकाच मागितली. यामुळे देवी पार्वती संतप्त झाली आणि तिने विश्रवा ऋषींना शाप दिला. त्यांना हव्या असलेल्या लंकेला शिवाच्या अवताराद्वारे जाळून राख केलं जाईल, असा हा शाप.
Ramayan : रावणाचा भाऊ ज्याला होती हजारो डोकी, सीतेने केला होता त्याचा वध
पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, पद्म पुराणात रावण, कुबेर, कुंभकर्ण, अहिरावण, शूर्पणखा आणि विभीषण हे विश्रवा ऋषींची मुलं होती असं नमूद केलं आहे. भगवान शिवाकडून लंकापुरी मिळाल्यानंतर विश्रवा ऋषींनी त्यांची पहिली पत्नी देवांगनाचा मुलगा कुबेराला लंकेचा राजा म्हणून नियुक्त केलं.
लंकेवर राजा कुबेराचं राज्य होतं. पण ऋषी विश्रवाची दुसरी पत्नी कैकसीच्या पुत्रांनी कुबेरला राजा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आणि लंका शहरासाठी आपापसात लढू लागले. पण रावणाने आपल्या ज्ञानाने आणि शौर्याने लंकापुरी काबीज केली आणि अशा प्रकारे कुबेराकडून लंका हिसकावून घेतल्यानंतर, रावण लंकेचा राजा बनला आणि त्यावर राज्य केलं.