हनुमानाने रामाला मदत करायला नकार दिला हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हनुमानाचा नकार ऐकून भगवान रामांनाही धक्का बसला. नेमकी ही कहाणी काय आहे पाहुयात.
खरंतर जेव्हा भगवान रामांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला, तेव्हा त्यांची मुलं लवकुशने तो घोडा पकडला. खूप समजावणी करूनही जेव्हा दोन्ही मुलांनी तो घोडा सोडला नाही. तेव्हा रामाच्या बाजूने योद्धे लढायला आले. या वेळी हनुमानही घोडा सोडवण्यासाठी लढायला तिथं पोहोचले. लव आणि कुश या दोन्ही मुलांनी हनुमानाला एक सामान्य वानर समजून पकडलं.
advertisement
Ramayan : युद्धात राम जिंकावा म्हणून त्याच्या विजयासाठी रावणानेच केला होता यज्ञ
घोडा सोडवण्यासाठी आलेले सर्व योद्धे एक एक करून पराभूत झाले तेव्हा भगवान राम स्वतः घोड्याला सोडण्यासाठी आले. तिथे पोहोचताच त्यांनी पाहिलं की हनुमान तिथं शांत बसला आहे. तेव्हा रामाला धक्काच बसला. ते म्हणाले, हनुमान, हे काय आहे? तुझ्यासारखा परमवीर असा लपून बसला आहे. प्रभू रामांकडून हे ऐकताच हनुमानाने लगेच उत्तर दिलं. तो म्हणाला की, मी सध्या माझं शौर्य दाखवू शकत नाही. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकत नाही. मी लव-कुशचा कैदी आहे. कृपया माझे हातपाय मोकळे करा, तरच मी तुम्हाला मदत करू शकेन. हे पाहून भगवान राम स्वतः स्तब्ध झाले.
Ramayan : रावणाचा भाऊ ज्याला होती हजारो डोकी, सीतेने केला होता त्याचा वध
रामानंद यांनी लिहिलेल्या रामायण मालिकेत हा संवाद दाखवण्यात आला आहे.
