TRENDING:

पोटाचं 'अजब' ऑपरेशन! या आजोबांच्या पोटातून काढले तब्बल 8000 खडे, डॉक्टरांचीही उडाली झोप; काय आहे हा दुर्मिळ प्रकार?

Last Updated:

गुरुग्रामच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय इतिहासातील एक दुर्मीळ केस पाहायला मिळाली. 70 वर्षीय रुग्णाच्या पित्ताशयातून तब्बल 8125 दगड एका लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेत काढण्यात आले. ही शस्त्रक्रिया अवघ्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एका 70 वर्षांच्या वृद्धाच्या पोटातून तब्बल 8000 पेक्षा जास्त पित्ताशयाचे खडे (Gall Stones) काढण्यात आले आहेत! डॉक्टरांच्या टीमने हे आव्हान स्वीकारत पित्ताशयाचे दगड यशस्वीरित्या काढले. एखाद्या व्यक्तीच्या पोटातून इतक्या मोठ्या प्रमाणात खडे काढण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण ऑपरेशन फक्त 60 मिनिटांत पूर्ण झालं, पण हे खडे मोजायला मात्र 6 तासांपेक्षा जास्त वेळ लागला! ही घटना हरियाणातील गुरुग्राममधील आहे.
Gallstones
Gallstones
advertisement

काय घडलं नेमकं?

गुरुग्राममधील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी एक दुर्मिळ शस्त्रक्रिया केली. त्यांनी एका 70 वर्षांच्या रुग्णाच्या पित्ताशयातून 8125 खडे यशस्वीरित्या काढून टाकले. त्यामुळे त्या रुग्णाला अनेक वर्षांपासून होणाऱ्या वेदना आणि त्रासातून मुक्ती मिळाली. गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णाला पोटदुखी, अधूनमधून ताप येणं, भूक न लागणं, अशक्तपणा आणि छातीत जडपणा जाणवत होता. या ऑपरेशनदरम्यान, 10 डॉक्टरांच्या टीमने एका तासाच्या आत हे ऑपरेशन यशस्वी करून दाखवलं.

advertisement

उपचारास टाळाटाळ, पण वेदना असह्य झाल्या...

सुरुवातीला रुग्णाला उपचार करून घेण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा त्याच्या वेदना वाढत गेल्या आणि असह्य झाल्या, तेव्हा त्याला गंभीर अवस्थेत फोर्टिस गुरुग्राममध्ये आणण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यावर लगेचच पोटाचा अल्ट्रासाऊंड करण्यात आला, ज्यामध्ये त्याच्या पित्ताशयात एक मोठा 'गोळा' (mass) दिसला. त्याची अवस्था पाहून डॉक्टरांनी तात्काळ 'मिनिमली इनव्हेसिव्ह लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया' (Minimally Invasive Laparoscopic Surgery) केली आणि पित्ताशयात जमा झालेले हजारो खडे काढून टाकले. ही शस्त्रक्रिया सुमारे एक तास चालली आणि 2 दिवसांनी रुग्णाला स्थिर अवस्थेत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

advertisement

खडे मोजायला लागले 6 तास!

फोर्टिसचे उपाध्यक्ष आणि सुविधा संचालक यश रावत यांनी सांगितलं की, हे एक आव्हानात्मक प्रकरण होतं. सुमारे एका तासाच्या शस्त्रक्रियेदरम्यान, रुग्णाच्या पित्ताशयातून दगड काढून अनेक वर्षांच्या वेदनांपासून त्याची सुटका करण्यात आली. पण शस्त्रक्रियेनंतरही खूप काम बाकी होतं, कारण सपोर्ट टीमला रुग्णाच्या पित्ताशयातून काढलेले पित्ताशयाचे दगड मोजायचे होते. शस्त्रक्रियेनंतर तासनतास बसून टीमने हे दगड मोजले असता, त्यांची संख्या धक्कादायकरित्या 8125 निघाली. ते म्हणाले की, हे प्रकरण दुर्मिळ होते, कदाचित असं कधीच घडलं नव्हतं.

advertisement

उपचार न केल्यास काय होतं?

यश रावत यांनी पुढे सांगितलं की, पित्ताशयातील खड्यांवर उपचार न केल्यास हळूहळू खड्यांची संख्या वाढत जाते. या प्रकरणात, रुग्णाने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या दुर्लक्षामुळे खड्यांची संख्या इतकी वाढली होती. आणखी उशीर झाला असता, तर रुग्णाची प्रकृती खूप बिघडली असती आणि पित्ताशयाच्या संसर्गासारख्या गंभीर तक्रारी, पोटात पू होणे, पित्ताशय कडक होणे (फायब्रोसिस) आणि पित्ताशयाच्या कर्करोगाची (Gallbladder Cancer) शक्यता देखील नाकारता येत नाही.

advertisement

असा दुर्मिळ प्रकार का घडतो?

शस्त्रक्रियेनंतर रुग्ण स्थिर असून त्याला कोणताही विशेष त्रास नाही. या प्रकरणात इतके मोठ्या प्रमाणात दगड पित्ताशयात असणे, हेच याला दुर्मिळ बनवते. हे खडे सहसा कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol) बनलेले असतात आणि बहुतेकदा लठ्ठपणा आणि जास्त कोलेस्ट्रॉल असलेल्या आहाराशी संबंधित असतात. उपाध्यक्ष आणि सुविधा संचालक यश रावत यांनी सांगितलं की, रुग्णाच्या पित्ताशयात मोठ्या प्रमाणात पित्ताशयाचे खडे असल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि दुर्मिळ होते. पण तरीही, डॉ. अमित जावेद यांच्या नेतृत्वाखालील आमच्या डॉक्टरांच्या टीमने अपवादात्मक कार्यक्षमता दाखवत हे प्रकरण यशस्वीरित्या हाताळले.

हे ही वाचा : तुळशीच्या मंजिरीचा 'हा' उपाय करेल कमाल! व्हाल प्रचंड श्रीमंत आणि कधीच भासणार नाही पैशांची चणचण

हे ही वाचा : जगातला सर्वात 'घाणेरडा' पक्षी! संपूर्ण अंगाला येतो शेणाचा वास, कारण वाचून व्हाल थक्क 

मराठी बातम्या/Viral/
पोटाचं 'अजब' ऑपरेशन! या आजोबांच्या पोटातून काढले तब्बल 8000 खडे, डॉक्टरांचीही उडाली झोप; काय आहे हा दुर्मिळ प्रकार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल