मिरर या ब्रिटिश वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रॉबर्ट मॉडस्लीने तुरुंगात असताना 1978मध्ये तीन सहकारी कैद्यांची हत्या केली होती. तेव्हापासून त्याला तुरुंगातही वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं होतं. वेस्ट यॉर्कशायरमधल्या तुरुंगात रॉबर्टसाठी एक विशेष खोली बांधण्यात आली होती. तिला बुलेटप्रूफ खिडक्या होत्या. त्याच्यासाठी काँक्रिटचा एक बेडही बनवलेला होता.
माजी गुप्तहेर पॉल हॅरिसन सामूहिक हत्येसाठी दोषी ठरलेल्यांची मुलाखत घेतात. त्यांनी 2018मध्ये मॉडस्लेची मुलाखत घेतली होती. हॅरिसन म्हणाले होते, की मुलाखतीमध्ये तो दैनंदिन गोष्टींबद्दल बोलत होता. त्याची वागणूक सीरियल किलरच्या स्वभावापेक्षा वेगळी होती. सीरियल किलर हे हिंसक असतात.
advertisement
रॉबर्टचं बालपण कठीण परिस्थितीत गेलं. तो लहानपणी लिव्हरपूलहून लंडनला पळून गेला होता. त्यानंतर तो वेश्याव्यवसायात अडकला. 1974मध्ये बाललैंगिक गुन्हेगाराच्या हत्येनंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. रॉबर्टने 1977मध्ये ब्रॉडमूर इथे एका व्यक्तीची प्लास्टिकच्या चमच्याने हत्या केली होती. या प्रकरणात पीडित व्यक्तीच्या कानात ब्लेड आढळलं होतं.
त्याने पीडित व्यक्तीच्या कानात विष टाकलं होतं, अशी अफवा पसरली होती. या घटनेमुळे त्याला 'हॅनिबल द कॅनिबल' हे नाव पडलं होतं. ब्रॉडमूर खून प्रकरणानंतर रॉबर्टला वेकफिल्ड इथल्या तुरुंगात पाठवलं होतं. तिथे त्याने 1978मध्ये आणखी दोन कैद्यांची हत्या केली.
रॉबर्टचा पुतण्या गेविन मॉडस्लेने त्याचा बचाव करताना सांगितलं, की जर त्याला बलात्कारी आणि बाललैंगिक शोषणाच्या प्रकरणातल्या आरोपींच्या संगतीत ठेवलं तर तो शक्य तितक्या लोकांना मारेल. त्याने ज्या लोकांना मारलं ते खरोखरच वाईट होते.
वेकफिल्ड जेलच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे, की काही गुन्हेगारांना एकांतात ठेवलं जातं. कारण ते इतरांसाठी धोकादायक असतात. त्यांना दररोज मोकळ्या हवेत फिरण्याची, भेटी घेण्याची, फोन कॉल करण्याची आणि इतर सर्वांप्रमाणे कायदेशीर सल्ला आणि वैद्यकीय सुविधांची परवानगी असते.
1991मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' या चित्रपटात सर अँथनी हॉपकिन्स यांनी साकारलेलं काल्पनिक पात्राचं रॉबर्ट मॉडस्लेशी साधर्म्य आहे.
