2005 मध्ये लंडनमधील एका लष्करी अकादमीत शिकत असताना प्रिन्स अलवालीद यांचा एक गंभीर रस्ते अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असताना, त्यांना ब्रेन हॅमरेज झालं म्हणजे मेंदूत रक्तस्राव झाला ज्यामुळे ते कोमात गेले . तेव्हापासून, प्रिन्स यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पण ते पुन्हा शुद्धीवर आले नाहीत.'
advertisement
हे पदार्थ खाऊन ज्या महिलेशी संबंध, तिचा मृत्यू, इराण-इस्राइल-तुर्कीहून भारतात आला तो नाश्ता
अपघातानंतर जेव्हा प्रिन्स अलवलीद कोमात गेले, तेव्हा त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या परंतु ते बरे होऊ शकले नाहीत. त्यांनी या अवस्थेत 20 वर्षे घालवली. म्हणूनच त्यांना स्लीपिंग प्रिन्स म्हटलं गेलं. जो सर्व सुखसोयी असूनही कधीही त्या उपभोगू शकला नाही.
त्यांचे वडील प्रिन्स खालिद बिन तलाल यांनी गेल्या दोन दशकांत त्यांच्या मुलाची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दरवर्षी रमजान, ईद आणि इतर धार्मिक प्रसंगी ते त्यांच्या मुलाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत राहिले. अनेक वेळा त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टही लिहिल्या . यावर्षी बकरी ईदच्या तिसऱ्या दिवशी ते त्यांच्या इतर मुलांसह रुग्णालयात गेले आणि अलवलीदसाठी प्रार्थना केली .
लव्ह मॅरेज केलेलं कपल फक्त एका टॉवेलसाठी भांडलं अन् नको तेच घडलं, हसता खेळता संसार उद्धवस्त
त्यांचे वडील प्रिन्स खालिद बिन तलाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टद्वारे आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत सांगितलं. 'अल्लाहच्या इच्छेवर आणि नशिबावर विश्वास ठेवून आम्ही आमच्या मुलाच्या मृत्यूची माहिती देत आहोत .', अशी इमोशनल पोस्ट त्यांनी केली.
प्रिन्स अलवालिद यांच्या निधनाने संपूर्ण सौदी अरेबियाला धक्का बसला आहे . एका राजकुमाराचा जीवन आणि मृत्यूसाठीचा दीर्घ संघर्ष जगभरातील लोकांना भावपूर्ण आहे . 22 जुलैपर्यंत अल फखारिया येथील प्रिन्स अलवालिद बिन तलाल यांच्या राजवाड्यात शोक व्यक्त केला जाईल.
