लव्ह मॅरेज केलेलं कपल फक्त एका टॉवेलसाठी भांडलं अन् नको तेच घडलं, हसता खेळता संसार उद्धवस्त
- Published by:Priya Lad
Last Updated:
Couple Fight After Marriage : लग्नाच्या 3 वर्षानंतंर कपलचं आनंदी वैवाहिक आयुष्य एका टॉवेलने उद्ध्वस्त केलं आहै. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
लखनऊ : पती-पत्नी म्हटलं की भांडणं आलीच. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यात भांडणं होताच. असंच एक कपल ज्यांच्यात टॉवेलवरून भांडणं झाली. पण हा वाद इतका विकोपाला गेला की लव्ह मॅरेज केलेल्या कपलचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला आहे. उत्तर प्रदेशच्या झाशीमधील ही धक्कादायक घटना आहे.
औरेया येथील राधा आणि झाशीतील प्रेम प्रकाश. दोघांची मैत्री होती. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या कुटुंबानेही याला मान्यता दिली. 3 वर्षांपूर्वी राधा आणि प्रेम प्रकाश यांचं लव्ह मॅरेज झालं. लग्नाच्या 3 वर्षानंतंर कपलचं आनंदी वैवाहिक आयुष्य एका टॉवेलने उद्ध्वस्त केलं आहै. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार राधा आणि तिच्या पतीमध्ये मोबाईलवर रील पाहण्यावरून वाद झाला होता. शनिवारी संध्याकाळी तिचा प्रेम प्रकाश शेतातून घरी आला. तो आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. त्यावेळी पत्नी राधा बेडवर झोपली होती. ती मोबाईलवर रील पाहत होती. आंघोळ केल्यानंतर प्रेम प्रकाशने पत्नी राधाकडे टॉवेल मागितला. बराच वेळ झाला तरी राधाने टॉवेल आणला नाही. प्रेम प्रकाशत रागातच बाथरूमबाहेरआला. यावेळी त्याने पाहिले की राधा रील पाहत होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला.
advertisement
रागाच्या भरात प्रेम प्रकाशने राधाच्या कानाखालली लगावली असं सांगण्यात येत आहे. राधाला याचा राग आला आणि ती विष प्यायली. कुटुंबीयांनी तिला झाशी मेडिकल कॉलेजमध्येही नेलं. पण तिचा मृत्यू झाला.
मृताच्या बहिणीने सांगितलं की, राधा आणि तिच्या पतीमध्ये वाद झाला होता. आम्ही तिला शांत राहण्यासही समजावून सांगितलं होतं. पतीसोबत टॉवेलवरून वाद झाला आणि त्याने तिला मारहाण केली. सध्या मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे, असं वृत्त यूपी तकने दिलं आहे.
Location :
Uttar Pradesh
First Published :
July 20, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/Viral/
लव्ह मॅरेज केलेलं कपल फक्त एका टॉवेलसाठी भांडलं अन् नको तेच घडलं, हसता खेळता संसार उद्धवस्त