पराठा तर तुम्ही खाल्लाच असेल. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पराठे मिळतात. असाच पराठा बनवताना विक्रेत्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. मात्र यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, विक्रेत्यानं पराठा बनवताना भरभरुन तेल टाकलं. आपण वर्षभरात जेवढं तेल खाऊ तेवढं त्यानं एकाच पराठ्याला वापरलं.
पराठ्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती पराठा बनवत आहे. तो पहिल्यांदा थोडं तेल पराठ्यावर टाकतो. परत तो पराठ्यावर तेल ओततो. असं तो बऱ्याच वेळा करतो. एवढ्या तेलातला पराठा खाणं म्हणजे हार्ट अटॅक आल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या तेलाचा पराठा पाहून कोणालाही खाऊ वाटणार नाही.
advertisement
इतकं तेल आहे की संपूर्ण पराठा तेलाच्या वर तरंगत असल्याचं दिसतंय. @HasnaZaruriHai नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 25 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवतोय.