त्यामुळे इथल्या काही कंपन्यांनी कर्मचाऱ्याने मोठी सिक लीव्ह घेतली तर तो खरच आजारी आहे का याची खातरजमा करण्यासाठी डिटेक्टिव्ह म्हणजेच हेर नेमायचा विचार केला आहे. जर्मनीतील कर्मचाऱ्याने खऱ्या आजारपणामुळे रजा घेतली असेल तर काहीही प्रश्न नाही. पण जर त्याने कंपनीला फसवून तब्येत बरी असताना आजारपणाची रजा घेतली असेल आणि तसं सिद्ध झालं तर कंपनी त्याच्यावर कारवाई करू शकते. जर्मनीतील खासगी डिटेक्टिव्ह मार्क्स लेंट्ज म्हणाले, ‘जर एखाद्या कर्मचाऱ्याने वर्षात 30 ते 40 दिवस किंवा क्वचित 100 दिवस जरी आजारपणाची रजा घेतली तर त्याचा कंपनीला आर्थिक फटका बसतो. मग कंपनीला त्या कर्मचाऱ्याला कामावर ठेवण्यात रस राहत नाही. जर्मनीत ऑटोमोबाईलपासून खतंनिर्मिती कंपन्या आहेत. युरोपातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला सिक लीव्हमुळे होणाऱ्या तोट्याबद्दल विचार करण्याची वेळ आता आली आहे.
advertisement
रिपोर्टिंग आहे कारण
काही जणांचं मत आहे की सिक लीव्हच्या रिपोर्टिंगमध्ये केलेल्या बदलांमुळे अशा सुट्ट्यांमध्ये फसवणूक करणं सोपं झालं आहे. विशेषज्ञ म्हणतात की, अतिकामाचा मनावर येणारा ताण आणि इतर मानसिक आजारांमुळे आजारपणाच्या सुट्ट्या घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. जर्मनीत आजारपणाच्या सुट्ट्या घेण्याची वृत्ती वाढली आहे, त्यामुळे उद्योगांसमोर आव्हानं उभी राहिल्याचं अनेकांनी मान्य केलंय. यामुळे जर्मनीतील उत्पादनापासून निर्यातीचं प्रमाणही घटल्याचं दिसतंय आणि त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोय.
जर्मन असोसिएशन ऑफ रिसर्च-बेस्ड फार्मास्युटिकल या कंपनीचे मुख्य अर्थतज्ज्ञ क्लॉस मिशेलसन म्हणाले, ‘या आव्हानामुळे देशातील आर्थिक घडामोडींवर नक्कीच परिणाम होतोय. असोसिएशनने केलेल्या संशोधनात असं दिसून आलं की आजारपणाच्या सुट्टीमुळे रजा घेण्याचं प्रमाण इतकं वाढलंय की गेल्या वर्षात जर्मनीतील एकूण राष्ट्रीय उत्पादनात 0.8 टक्के घट झाली. यामुळे अर्थव्यवस्थेला जोरदार फटका बसला.’
सिक लीव्ह प्रमाण 2021 च्या तुलनेत वाढलं
जर्मनीतील संघीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येतं की, गेल्यावर्षी जर्मनीतील कामगारांनी सरासरी 15.1 दिवस सिक लीव्ह घेतल्या आहेत. 2021 मध्ये अशी रजा घेण्याचं प्रमाण 11.1 दिवस होतं. म्हणजे 2021 च्या तुलनेत 2024 मध्ये सिक लीव्ह घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. जर्मनीतील एका प्रमुख अधिकृत आरोग्य विमा करणाऱ्या कंपनीने सांगितलं की गेल्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत आजारी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांची सरासरी संख्या 14.13 होती जी खूपच जास्त आहे.
आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी आजारपणामुळे जर्मनीतील उद्योगात सरासरी 6.8 टक्के मानवी श्रमाच्या तासांत घट झाली. फ्रान्स, इटली आणि स्पेनसारख्या युरोपियन युनियनमधील देशांच्या तुलनेत जर्मनची स्थिती खूपच खालावत आहे. त्यामुळे कंपन्या आता सिक लीव्ह घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची हेरगिरी करून तो खरंच आजारी आहे का याची खातरजमा करणार आहे. जर कर्मचाऱ्याने काम टाळण्यासाठी सिक लीव्हच्या सोयीचा वापर केला असेल आणि तसं सिद्ध झालं तर मात्र कंपनी त्याच्यावर कारवाई करणार आहे असं इथल्या सूत्रांनी सांगितलं.
