एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमध्ये इन्फ्लुएन्सर सिम्पसन्स कार्टुनचा संदर्भ देत 16 जानेवारी 2025 ला जगावर येणाऱ्या संकटाचा दावा करतो. आता हे संकट कोणतं, हे जाणून घेण्याची घाई तुम्हाला असेल.
advertisement
या इन्फ्ल्युएसरनं सांगितलं की, द सिम्पसनच्या एका एपिसोडमध्ये असं दाखवण्यात आलं होते की 16 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण जगाला इंटरनेट ब्लॅकआउटचा सामना करावा लागेल सिम्पसन्स भविष्याचा अचूक अंदाज लावण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे या दाव्याबाबत इंटरनेटवर बरीच चर्चा सुरू आहे.
दरम्यान या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही लोक जागतिक आउटेजचा दावा करत आहेत, तर काही लोक म्हणतात की ते फक्त अमेरिकेपुरते मर्यादित असेल. काहींनी या रिलची खिल्ली उडवली आहे. काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत.
व्हिडिओच्या काही आवृत्त्यांमध्ये असेही जोडले गेले आहे की पांढऱ्या शार्कने पाण्याखालील केबल चघळल्याने आउटेज होऊ शकते. एक युझर म्हणाला, 'रिचार्ज 16 जानेवारीला संपणार आहे.' तर दुसरा म्हणाला, 'मी घरून काम करतो. तर तिसरा म्हणाला, मी रजेवर आहे.