पण असं असलं तरी देखील काही अशी मंडळी आहेत जी सापाला हलक्यत घेतात आणि त्याच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे ते स्वत:चा जीव तर धोक्यात टाकतातच पण कधीकधी इतरांना देखील याची शिक्षा भोगावी लागते.
अलीकडे सोशल मीडियावर सापाशी संबंधीत व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सापाशी खेळताना एक व्यक्ती दिसत आहे. त्यामुळे त्याच्या प्रायव्हेट पार्टला सापाने चावा घेतला.
advertisement
इंडोनेशियन सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर अंगारा शोजीला साप चावल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. शोजी अनेकदा त्याच्या सोशल मीडियावर सापांसोबतच्या त्याच्या साहसांचे व्हिडिओ शेअर करतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये एका सापाने त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतल्याचे दिसत आहे, जे प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहे.
अंगाराचा हा व्हिडिओ सध्या खळबळ माजवत आहे. अंगाराने केलेल्या या जोखमीच्या स्टंटने सर्वांनाच थक्क केले आहे. व्हिडिओमध्ये साप त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावताना दिसत आहे. मात्र, साप आपला भाग घट्ट पकडून ठेवतो आणि तो खेचूनही सोडत नाही. त्यावेळी अंगारा वेदनेने कळवळत होता.
हा व्हिडीओ पाहणारे नेटिझन्स कमेंट करत आहेत. सापांच्या पंखांमध्ये विष असते. जर तुम्हाला साप चावला तर तुम्ही मराल. ‘असे स्टंट करू नका,’ अशी टिप्पणी करत आहेत. हा साप खारफुटीच्या जंगलातील प्रजातीचा असू शकतो, असे काहींचे म्हणणं आहे. या व्हिडिओतील साप पिवळा आणि काळा आहे. खारफुटीचे साप सौम्य विषारी मानले जातात. त्यामुळे तसा अंगाराला काही झालं नसावं अशी अपेक्षा केली जात आहे.