TRENDING:

विमानात निघाला साप, प्रवाशांचा उडाला थरकाप; SHOCKING VIDEO व्हायरल

Last Updated:

साप हा खूप धोकादायक आणि विषारी प्राणी आहे. साप कधी कुठे निघेल सांगता येत नाही कारण ते अडगळीच्या जागी, थंडगार ठिकाणी लपून बसतात. जिथे कोपरा किंवा लक्ष न जाणारी जागा मिळेल तिथे घुसतात. साप निघाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : साप हा खूप धोकादायक आणि विषारी प्राणी आहे. साप कधी कुठे निघेल सांगता येत नाही कारण ते अडगळीच्या जागी, थंडगार ठिकाणी लपून बसतात. जिथे कोपरा किंवा लक्ष न जाणारी जागा मिळेल तिथे घुसतात. साप निघाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. तुम्हीही या घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. मात्र कधी विमानात साप निघाल्याचं पाहिलं किंवा ऐकलंय का? सध्या समोर आलेल्या घटनेत चक्क विमानात साप निघाला.
विमानात निघाला साप, प्रवाशांचा उडाला थरकाप
विमानात निघाला साप, प्रवाशांचा उडाला थरकाप
advertisement

विमानात साप निघाल्याची घटना समोर आली असून याचा व्हिडीओदेखील व्हायरल होतोय. विमानानं उड्डणा घेतल्यावर हवेत असताना साप बाहेर आला. यामुळे प्रवाश्यांनाही धक्का बसला. मात्र वेळीच फ्लाइट अटेंडंटनं सावधानी वापरुन सापाला बॅगेत टाकलं तेव्हा कुठे प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विमानात प्रवासी बसलेले आहेत आणि ते घाबरलेल्या अवस्थेत दिसतायेत. कारण ते बसलेल्या फ्लाइटमध्ये साप निघाला. प्रवासी सीटच्यावर असलेल्या भागावर हा साप फिरत होता. एका विमानातील कर्मचाऱ्यानं धाडस करुन तो साप पकडण्याचा प्रयत्न केला. काही वेळ प्रयत्न केल्यावर तो सापाला एका बॅगमध्ये भरायला यशस्वी झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रंगांची उधळण आणि आनंदाचा सोहळा, पुण्यात विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे’चा जल्लोष
सर्व पहा

@MothershipSG नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 55 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. हा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटवर व्हायरल होत असून अनेक कमेंटही येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
विमानात निघाला साप, प्रवाशांचा उडाला थरकाप; SHOCKING VIDEO व्हायरल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल