TRENDING:

सोशल मीडियाची नशा; प्रसिद्धीसाठी तरुणीनं जीव धोक्यात टाकला, उंच इमारतीवरुन खाली लटकली

Last Updated:

लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारची नशा असते. कोणाला खाण्याची तर कोणाला ड्रिंकची. मात्र आजकाल लोकांना सोशल मीडियाची नशा झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारची नशा असते. कोणाला खाण्याची तर कोणाला ड्रिंकची. मात्र आजकाल लोकांना सोशल मीडियाची नशा झाली आहे. सोशल मीडियामागे लोक एवढे वेडे झाले आहेत की, आपण व्हायरल होण्यासाठी, प्रसिद्धीसाठी काय करतोय याचं भानच राहत नाही. सोशल मीडियाची ही क्रेझ, नशा अनेकांच्या जीवावरही बेतते. सध्या एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एक तरुणी सोशल मीडियासाठी व्हिडीओ बनवतेय. मात्र ती त्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते.
प्रसिद्धीसाठी तरुणीनं जीव धोक्यात टाकला
प्रसिद्धीसाठी तरुणीनं जीव धोक्यात टाकला
advertisement

इंटरनेटच्या जगात लोक प्रसिद्धीसाठी काहीही करु शकतात. स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही लोक कमी करत नाहीत. असाच प्रकार सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळाला. एक तरुणी उंच बिल्डिंगवरुन स्टंटबाजी करताना दिसून आली. तिनं अक्षरशः तिच्या मित्राच्या हाताच्या सहाय्यानं भल्यामोठ्या बिल्डिंगच्या खिडकीतून लटकली. हे दृश्य पाहूनच अंगावर काटा येतोय.

Deepfake : डीपफेक थांबवण्यासाठी व्हॉट्सॲपचा पुढाकार, 4 भाषांमध्ये मिळणार सुविधा

advertisement

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण तरुणी भल्यामोठ्या बिल्डिंगमध्ये आहेत. सोशल मीडियावर व्हिडीओ बनवताना ती मित्राच्या हाताच्या सहाय्यानं एवढ्या मोठ्या बिल्डिंगला लटकते. सुदैवानं मुलीला काही होत नाही. मात्र थोडीशीही चूक झाली असती तर तरुणीचा थेट जीवच गेला असता. कारण ती कोणत्याही सेफ्टीशिवाय ही स्टंटबाजी करत होती.

@interesting_aIl नावाच्या X अकाऊंटवर हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 47 सेकंदांचा हा व्हिडीओ खूपच थरारक आहे. पाहूनच कोणाच्याही अंगावर काटा येईल. लोस प्रसिद्धीसाठी, चर्चेत येण्यासाठी जीवाचीही बाजू लावू शकतात हे या व्हिडीओवरुन पहायला मिळतंय.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे भाव तेजीत, डाळींब आणि केळीला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर, धक्कादायक, स्टंटबाजी करतानाचे थरारक व्हिडीओ समोर येत असतात. सोशल मीडियासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात.

मराठी बातम्या/Viral/
सोशल मीडियाची नशा; प्रसिद्धीसाठी तरुणीनं जीव धोक्यात टाकला, उंच इमारतीवरुन खाली लटकली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल