लोक आवर्जुन पाहताहेत व्हिडीओ
ही घटना तेव्हा सुरू झाली, जेव्हा "थारा दादा हडुमान" नावाचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होऊ लागले. या व्हिडिओमध्ये राजस्थानी वेशभूषेत दिसणारा एक वृद्ध माणूस एका तरुण महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहे. ही तरुण महिला त्या वयस्क काकाची मेहुणी असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये ते दोघे OYO हॉटेलच्या बाहेर दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये या काकाने मेहुणीला स्पासाठीही नेले होते. या व्हिडिओमुळे हजारो फॉलोअर्स मिळाले आणि लोकांना या या काकाचे "उद्योग" बघायला मजा येऊ लागली.
advertisement
कायदेशीरदृष्ट्या गंभीर चिंतेची बाब
चौकशीतून असे समोर आले आहे की, "थारा दादा हडुमान" ही खरी व्यक्ती नाही. हे AI-जनरेटेड कॅरेक्टर आहे, जे डीपफेक तंत्रज्ञान आणि एआय साधनांचा वापर करून तयार केले आहे. असे पात्र तयार करण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर केला जातो, जे प्रत्यक्षात दिसणारे चेहरे, आवाज आणि वर्तन डिजिटल पद्धतीने तयार करते. भारतात एआय इन्फ्लुएन्सर्सचा ट्रेंड वाढत आहे, 2024 मध्ये "नैना" सारख्या एआय पात्रांच्या लोकप्रियतेतून हे दिसून येते. पण या प्रकरणात, अश्लील सामग्री तयार करण्यासाठी एआयचा गैरवापर करण्यात आला, जी सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर चिंतेची बाब आहे.
हा तर AI चा मोठा धोका
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर लोक दोन गटांत विभागले गेले आहेत. काही लोक याला विनोद म्हणून घेत आहेत, तर काही जण याला राजस्थानी संस्कृतीवर हल्ला मानत आहेत. 2024 मध्ये दीपिका पदुकोण आणि रश्मिका मंदान्ना यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींचेही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामुळे या तंत्रज्ञानाचा धोका समोर आला होता.
हे ही वाचा : या 5 सापांच्या पिल्लांना घेऊ नका हलक्यात; त्यांचा एक छोटासा दंशही करेल खेळ खल्लास!
हे ही वाचा : VIDEO : कारच्या कव्हरखाली चाललंय काय? 2 लहान मुलांचा कांड कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांनी बसला धक्का!
