मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ही हृदयद्रावर घटना आहे. जाटखेडी येथील निरुपम रॉयल व्हिला कॉलनीत राहणारे ऋषिराज भटनागर यांचा 8 वर्षांचा मुलगा देवांश लिफ्टमध्ये अडकला. त्याला वाचवायला गेलेल्या ऋषिराज यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला.
मासे खाल्ल्याने पडलं टक्कल! तुम्ही तर खात नाहीयेत ना हा मासा, केसगळतीचं हेच ते कारण
advertisement
माहितीनुसार सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर साडेदहाच्या सुमारास ऋषिराज वॉकला गेले. तेव्हा देवांश खाली खेळत होता. त्यांनी त्याला घरी जायला सांगितलं. देवांश घरी जायला म्हणून लिफ्टमध्ये गेला आणि तेव्हाच लाइट गेली. देवांश लिफ्टमध्ये अडकला. हे कळताच ऋषिराज लेकाला वाचवायला धावत गेले. मुलाला वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली.
जनरेटर चालू करण्यासाठी म्हणून त्यांनी गार्ड रूमकडे धाव घेतली. त्यांनी सिक्युरिटी गार्डला जनरेटर चालू करायला सांगितलं. त्यांनी त्याच्याकडे लिफ्टची चावीसुद्धा मागितली, असं स्थानिकांनी सांगितलं. लिफ्टच्या दिशेने ते काही पावलं चालले तेव्हाच त्यांच्या छातीत कळ आली, तीव्र वेदना झाल्या आणि ते तिथंच कोसळले, बेशुद्ध झाले.
Health Risk Of The Day : फळं खाल्ल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्याने काय होतं?
अवघ्या 3 मिनिटांनी देवांश लिफ्टमधून सुखरूप बाहेर आला. पण तोपर्यंत वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. स्थानिक लोकांनी त्यांना ते बेशुद्ध झाल्यानंतर ताबडतोब रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
कुणाला हार्ट अटॅक आल्यावर काय करायचं?
हार्ट अटॅक आल्यावर जर सदर व्यक्ती शुद्धीत असेल, तर त्याला तुम्ही ताबडतोब त्यांना 300 मिलीग्राम एस्पिरिन देऊ शकता. हे औषध रक्त पातळ करण्यासाठी महत्त्वाचं असतं. कधीकधी रक्ताच्या गुठळ्या होणं हे हार्ट अटॅकचं कारण बनू शकतं. तर या औषधाने रुग्नाला काहीकाळ आराम मिळू शकतो. पण यासह रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जाणं महत्वाचं असतं.
हार्ट अटॅकमुळे जर रुग्ण बेशुद्ध पडला असेल तर त्याला ताबडतोब सपाट ठिकाणी झोपवा. नंतर त्याच्या नाकाजवळ बोटांनी किंवा कानांनी त्याचा श्वास येतोय की नाही ते तपासा. तसेच नाडी देखील तपासा. जर रुग्णाला तपासल्यावर त्याचा श्वास किंवा नाडी येत नसेल तर ताबडतोब सीपीआर द्या.
सीपीआर कसा द्यायचा?
यासाठी आपला डावा हात सरळ ठेवा आणि उजवा हात त्याच्या वर ठेवा आणि बोटांनी लॉक करा. यानंतर, आपले हात रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी आणा आणि आपल्या सर्व ताकदीनिशी रुग्णाची छाती दाबा. लक्षात घ्या दर मिनिटाला 100 कॉम्प्रेशन्स द्याव्या लागतील, ही क्रिया रुग्ण शुद्धीवर येईपर्यंत किंवा रुग्णवाहिका येईपर्यंत करावी लागेल. रुग्णाची छाती दाबा आणि प्रत्येक 25 ते 30 वेळा रुग्णाला तोंडाद्वारे ऑक्सिजन द्या. तोंडाद्वारे ऑक्सिजन देताना त्या व्यक्तीचे नाक बंद करा.
परंतू कॉम्प्रेशन दरम्यान, रुग्णाच्या छातीच्या हाडात किंवा बरगड्यांमध्ये कोणतीही समस्या नसल्याची खात्री करून घ्या. कारण रुग्णाचं आयुष्य वाचवणं याला प्रथम प्राधान्य आहे. उर्वरित समस्या रुग्णालयात देखील हाताळल्या जाऊ शकतात. हार्ट अटॅक आलेल्या रुग्णावर प्रथमोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
